जामखेड प्रतिनिधी
जामखेड न्युज – – (सुदाम वराट)
कर्जत-जामखेड मतदारसंघात समृद्ध गाव संकल्प अंतर्गत मोठ्या प्रमाणात सध्या कामे सुरु आहेत. समृद्ध गाव संकल्प अंतर्गत जल, शेती, शिक्षण, आरोग्य, महिला सबलीकरण, हागणदारीमुक्त गाव, स्वच्छ सुंदर प्लास्टिक मुक्त गाव अशा सात महत्वपूर्ण मुद्यांवर भर देण्यात आला आहे.
ADVERTISEMENT 

२०२१ च्या एप्रिल महिन्यात कर्जत तालुक्यातील २० आणि जामखेड तालुक्यातील २० गावे अशा एकूण ४० गावांना बारामती आणि जामखेड येथे प्रशिक्षण कार्यक्रम राबविण्यात आला.
ADVERTISEMENT

तद्नंतर अनेक ग्रामसभा आयोजित करून विविध अभ्यासपूर्ण घटकांचा समावेश करून मार्गदर्शन व चर्चा करण्यात आली. स्वच्छतेचे महत्व, शौचालयाचा वापर, श्रमदानातुन गाव स्वच्छता, जलसंधारणाची कामे, महिलांचे संघटन केले, शेतीचे विकसित तंत्रज्ञान, बी-बियाणे, शिक्षकांचे प्रशिक्षण अशा विविध प्रकारच्या उपक्रमांची सुरुवात करण्यात आली. समाविष्ट करण्यात आलेल्या व सहभागी झालेल्या सर्वच गावांनी व ग्रामस्थांनी उपक्रमाला उदंड प्रतिसाद दिला.
ADVERTISEMENT 

गावे स्वच्छ झाली, पडकी घरे, वाडे यातील टाकाऊ वस्तू बाहेर काढून दगड इतर कामाला वापरायला सुरुवात झाली. जलसंधारण बरोबर मनसंधारण झाले. कर्जत-जामखेड मतदारसंघातील थेरगाव येथेही उत्तम काम झाले असून सध्या मोठ्या प्रमाणात कामे सुरू आहेत.
ADVERTISEMENT 

१४ नोव्हेंबर रोजी समृद्ध गाव संकल्प उपक्रमात सहभागी सर्व गावांना थेरगावकरांनी कार्यक्रमासाठी निमंत्रित केले होते. उपक्रमात सामाविष्ट असलेल्या सर्व गावांनी थेरगावमध्ये यावे झालेले व सुरूर असलेले काम पहावे व आपआपल्या गावांमध्ये सुरू असलेल्या कामातील अडचणी, सुधारणा यासाठी असलेला वाव, भविष्यात समस्या निर्माण होऊ नये यासाठी घ्यावयाची खबरदारी झालेल्या चुका सुधाराव्यात व तेथील कामाला दिशा मिळावी या दृष्टिकोनातून हा कार्यक्रम दिशादर्शक झाला. अवघ्या सहा महिन्यांत ३० गावात अतिशय महत्त्वपूर्ण बदल झालेले आहेत. थेरगाव येथील कार्यक्रमासाठी कर्जत जामखेड मतदारसंघाचे लोकप्रिय आमदार रोहित पवार, सर्व अधिकारी, सरपंच, सदस्य, श्रमदान करणारे युवक उपस्थित होते. सगळ्यांनी गाव बघुन झाल्यावर सभागृहात एकत्र येऊन आ. रोहित पवार, प्रशासकीय अधिकारी, सरपंच यांच्याशी चर्चा केली. आ.रोहित पवार यांनी संपूर्ण सहकार्य या कामासाठी केलेले आहे.
सध्या सुरू असलेल्या कामांमध्ये व उपक्रमात ते काय-काय मदत करू शकतात, सर्वच गावे एकविचाराने संघटित असावीत, कुणामध्येही कोणत्याही प्रकारचा मतभेद नसावा, विकासाच्या सर्व योजना गावात आणल्या पाहीजेत यावर आ. रोहित पवार यांनी सर्व उपस्थितांना सकारात्मक मार्गदर्शन केले.








