Sunday, February 15, 2026
Home ताज्या बातम्या उदय शेळके अन् प्रशांत गायकवाड यांचे अजित पवार यांच्याकडून कौतुक…

उदय शेळके अन् प्रशांत गायकवाड यांचे अजित पवार यांच्याकडून कौतुक…

0
264
जामखेड न्युज – – – – 
उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी नगर जिल्हा सहकारी बँकेचे अध्यक्ष उदयराव शेळके व पारनेर बाजार समितीचे सभापती व जिल्हा बँकेचे संचालक प्रशांत गायकवाड यांच्या कार्याचे भरभरून कौतुक करत शेतकऱ्यांसाठी सतत काम करत रहा असा सल्ला दिला.
                               ADVERTISEMENT
 
कर्जत-जामखेडचे आमदार रोहित पवार यांच्या प्रयत्नातून मंजूर झालेल्या विविध विकासकामांचा शुभारंभ उपमुख्यमंत्री अजित पवार व राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांच्या हस्ते नुकतेच झाले.
जामखेड येथे आयोजित सभेत अजित पवार यांनी शेळके व गायकवाड यांची स्तुती करून करत असलेल्या कार्याचे भरभरून कौतुक केले. यावेळी आ. निलेश लंके, आ. संग्राम जगताप, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र फाळके यांच्यासह महाविकास आघाडीचे नेते उपस्थित होते.
                             ADVERTISEMENT  
आदर्श काम कसे चालते याचा दाखला देताना मंत्री पवार यांनी पारनेर बाजार समितीच्या कारभाराचा दाखला देत प्रशांत गायकवाड यांचे कौतुक करत सर्व सामान्य शेतकऱ्यांना जिल्हा बँकेच्या माध्यमातून कर्ज पुरवठा ग्रामीण भागातील शेतकऱ्यांना मदत करण्याच्या सूचना केल्या.
                      ADVERTISEMENT 
जिल्हा बँकेचा कारभार अध्यक्ष उदय शेळके यांच्या नेतृत्वाखाली उत्तम सुरू आहे. पण काही  शेतकऱ्यांची अडवणूक होत असल्याच्या तक्रारी आल्या आहेत.
या तक्रारीचा धागा पकडून पवार प्रशांत गायकवाड यांना म्हणाले, तुम्ही केवळ पारनेर तालुक्याचे संचालक नसून पूर्ण जिल्ह्याचे संचालक आहेत. त्यामुळे कर्जत-जामखेडच्या शेतकऱ्यांचेही प्रश्न सोडवण्यासाठी काम करा.
                          ADVERTISEMENT  
उदय शेळके सॉलिसिटर गुलाबराव शेळके यांचा वारसा समर्थपणे चालवत आहेत. जिल्हा बँक व महानगर बँक दोन्ही ठिकाणी त्यांचे काम चांगले सुरू आहे. महानगर बँक लवकरच मुंबई येथे स्वमालकीची इमारत उभारत आहे, हे अभिमानास्पद असल्याचे सांगितले.
           चौकट
जिल्हा बॅक शेतकऱ्यांसाठी चार लाख रुपयांपर्यंत बिनव्याजी कर्ज पुरवठा करते याचा लाभ घ्यावा असे सांगितले पण जिल्हा बॅक बिनव्याजी कर्ज पुरवठा करते पण प्रत्येक गावातील सोसायट्या या शेतकऱ्यांकडून व्याज आकारतात व्याजासह रक्कम भरून घेतली जाते. आणी काही व्याज राज्य शासन देणार व काही केंद्र शासन देणार असे सांगितले जाते पण हे व्याज येत नाही तसेच शेअर्स रूपाने काही रक्कम गोळा केली जाते. हेही परत मिळत नाही जेव्हा सोसायटी नफ्यात येईल तेव्हा शेअर्स परत करण्यात येतील यामुळे सोसायटी नफ्यात येत नाही तसे दाखवत नाहीत त्यामुळे शेतकऱ्यांना बिनव्याजी कर्ज मिळत नाही. हि फक्त कागदावरचीच घोषणा आहे असे वाटते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

error: Content is protected !!