रामचंद्र बोधले महाराज पुण्यतिथी महोत्सवानिमित्त साकत मध्ये कैलास महाराज भोरे यांचे गुलालाच्या किर्तनासाठी मोठा जनसमुदाय उपस्थित

0
253
जामखेड प्रतिनिधी 
   श्री सद्गुरू रामचंद्र बोधले महाराज पुण्यतिथी महोत्सवानिमित्त अखंड हरिनाम सप्ताह व श्रीमत भगवतगिता पारायण सोहळ्याची साकत मध्ये मोठ्या उत्साहात सुरूवात आज कैलास महाराज भोरे यांचे गुलालाचे किर्तन झाले यासाठी मोठ्या प्रमाणावर जनसमुदाय उपस्थित होता.
         श्रीगुरू वै. ह. भ. प. प. पु. आदरणीय वंदनीय रामचंद्र बोधले महाराज हे संत शिवाजी बोधले महाराज व संत माणकोजी बोधले महाराज यांच्या वंशातील नववे सत्पुरुष होते. यांनी साकत मध्ये विठ्ठल मंदिरात १ मे १९५५ मध्ये अखंड विनावादन व नंदादीप सुरू केलेली आजपावोती सुरूच आहे. त्यांच्या ३९ व्या पुण्यतिथीचे आयोजन ह. भ. प. विवेकानंद भारती उर्फ उत्तम महाराज वराट यांच्या मार्गदर्शनाखाली व सर्व साकत परिसरातील भक्तगणांच्या सहकार्याने अखंड हरिनाम सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे महाराष्ट्रातील मान्यवर किर्तनकार, प्रवचनकार, गायक, वादकांची उपस्थिती होती
  ह. भ. प. उत्तम महाराज वराट यांनी ग्रामस्थांच्या सहकार्याने खुपच चांगल्या प्रकारे नियोजन केले होते उद्या सकाळी दहा ते बारा या वेळेत ह. भ. प. उत्तम महाराज वराट यांचे काल्याचे किर्तन होणार आहे.
   दि. २३ शनिवारी ह. भ. प. कल्याण महाराज कोल्हे,
 दि. २४  रविवारी ह. भ. प. भागवत महाराज दळवी यांचे किर्तन झाले त्यांनी
     पवित्र सोंवळीं । एक तीं च भूमंडळीं ॥१॥
ज्यांचा आवडता देव । अखंडित प्रेमभाव ॥ध्रु.॥
तीं च भाग्यवंतें । सरतीं पुरतीं धनवित्तें ॥२॥
तुका म्हणे देवा । त्यांची केल्या पावे सेवा ॥३॥
   या तुकाराम महाराजांच्या अभंगाचे रसाळ वाणीने निरूपण केले सर्व श्रोते गुणांना मंत्रमुग्ध केले.
  दि. २५ सोमवारी जनार्दन महाराज मत्स्येद्रगड, मंगळवारी पोपट महाराज पाटील, बुधवारी दिनकर महाराज शेवगाव कर, गुरुवारी अर्जुन महाराज लाड व्याकरणाचार्य होळ,
यांची किर्तने झाली
आज शुक्रवारी १२ ते ०२  या वेळेत ह. भ. प. कैलास महाराज भोरे यांचे गुलालाचे किर्तन झाले यासाठी मोठ्या प्रमाणावर गर्दी होती.  त्यांनी संत तुकाराम महाराजांच्या अभंगाचे रसाळ वाणीने निरूपण केले. यावेळी कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक संजय वराट, साकत सेवा संस्थेचे अध्यक्ष प्रा. अरुण वराट, गायक हरिभाऊ काळे यांच्या सह अनेक मान्यवर उपस्थित होते.
धन्य आज दिन | झाले संतांचे दर्शन ||1||
झाली पापातापा तुटी | दैन्य गेले उठाउठी ||धृ||
झाले समाधान | पायी विसावले मन ||2||
तुका म्हणे आले घरा | तोचि दिवाळी दसरा ||3||
या अभंगाचे अत्यंत रसाळ वाणीने निरूपण केले व गावत वै. ह. भ. प. प. पु. रामचंद्र महाराज बोधले यांची या गावावर मोठी श्रद्धा होती गावातील नंदादीप व वीनावादन आजही सुरू आहे. ते साकतमध्ये एक एक महिना राहत असत अशा थोर महात्‍म्याचे मंदिर गावात व्हावे अशी इच्छा व्यक्त केली त्याला ग्रामस्थांनीही प्रतिसाद देत लवकरच गावात मंदिर करण्याचे ठरले
आज शुक्रवारी सायंकाळी ज्ञानसिंधु संदिपान महाराज शिंदे हसेगावकर अध्यक्ष वारकरी शिक्षण संस्था आळंदी यांचे किर्तन होणार आहे.
   
उद्या शनिवारी दि. २९ रोजी सकाळी १० ते  १२ या वेळेत ह. भ. प. उत्तम महाराज वराट यांचे काल्याचे किर्तन होईल तरी परिसरातील भाविक भक्तांनी या सुवर्ण संधीचा लाभ घ्यावा असे आवाहन ह. भ. प. उत्तम महाराज वराट यांनी केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here