जामखेड प्रतिनिधी
जामखेड न्युज – – (सुदाम वराट)
जामखेड तालुक्यातील देवदैठण येथील जिजामाता माध्यमिक हायस्कूलचे सेवानिवृत्त मुख्याध्यापक प्रकाश दगडू खारगे यांचे सुपुत्र अजित प्रकाश खारगे यांना वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाचे विद्यापीठ सुवर्ण पदक प्रदान प्रदान करण्यात आले.
दि. २५ ऑक्टोबर रोजी परभणी येथील वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ परभणी चा २३ वा पदवी दीक्षांत समारंभ कार्यक्रम पार पडला. यावेळी उपस्थित महाराष्ट्र राज्याचे सन्माननीय कृषिमंत्री ना. दादाजी भुसे, जेष्ठ कृषी शास्त्रज्ञ डॉ. चारुदत्त मायी, वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ, परभणीचे कुलगुरू डॉ. अशोक ढवण, कोकण कृषी विद्यापीठाचे डॉ. बाळासाहेब सावंत, दापोलीचे कुलगुरू डॉ. संजय सावंत या सर्व मान्यवरांच्या उपस्थितीत हे सुवर्ण पदक प्रदान करण्यात आले.
या यशाबद्दल जामखेड येथील शिवनेरी करिअर स्वप्नपूर्ती अॅकॅडमीचे संचालक सेवा निवृत्त कॅप्टन लक्ष्मणराव भोरे,
जिजामाता माध्यमिक विद्यालयाचे मुख्याध्यापक रामेश्वर धुमाळ सर, कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक प्रा. संजय वराट सर, श्री साकेश्वर विद्यालयाचे शिक्षक राजकुमार थोरवे, सातपुते सर यांचे सह विविध क्षेत्रातील मान्यवरांकडून अभिनंदन होत आहे.






