शांतीलाल गुगळे यांनी वडिलांच्या स्मृतिप्रीत्यर्थ जाहीर केलेल्या जैन संघाच्या इमारतीचा भुमिपूजन समारंभ संपन्न

0
229
जामखेड प्रतिनिधी 
            जामखेड न्युज – – (सुदाम वराट ) 
 दानशूर शांतीलाल गुगळे परिवाराने दिलेला शब्द पाळुन, बोले तैसा चाले त्याची वंदावी पावले या वृक्तीचा प्रत्यय समाजासमोर ठेवला असल्याचे गौरोदगार जैन श्रावक संघाचे अध्यक्ष कांतीलाल कोठारी यांनी काढले आहेत.
     शहरातील दानशूर असलले शांतीलाल गुगळे यांनी गेल्या तीन महिन्यापूर्वी जैन समाजाची खुली जागा बांधून देण्याचे आश्वासन दिले होते. शुक्रवारी (दि.२२)  जुन्या स्थानकाचे भूमिपूजन करण्यात आले. यावेळी कांतीलाल कोठारी बोलत होतो. यावेळी  दानशूर शांतीलाल गुगळे व त्यांच्या पत्नी राजलबाई गुगळे यांच्या हस्ते भूमीपुजन करण्यात आले. यावेळी जैनश्रावक संघाचे अध्यक्ष कांतीलाल कोठारी, सेक्रेटरी दिलीप गुगळे, सामाजिक कार्यकर्ते संजय कोठारी, दिलीप बाफना, कांतीलाल भळगट, आसराज बोथरा ,प्रशांत बोरा ,सुभाष भंडारी ,ॲड.हिरालाल गुंदेचा ,संजय नहार, डॉ.सी पी मेहेर ,अशोक शिंगवी, अशोक चोरडिया ,अशोक पितळे ,अशोक गांधी , रवींद्र छाजेड उमेश नगरे , विजय कुलथे,प्रवीण चोरडिया,विजय बोगावत, अमोल तातेड,विनोद बोरा , मनोज भंडारी,विनोद बेदमुथा, अमृत कोठारी, संजय कटारिया, कांतीलाल बोथरा, निलेश भंडारी, कैलाश शर्मा ,प्रदीप नहार ,लिलाचंद मंडलेचा, शांतीलाल शिंगवी, मनसुखलाल गांधी, वसंत
लाल गांधी ,पोपटलाल हाळपावत , पिंटू बोरा,जितेंद्र बोरा आदी जैन समाज मोठ्या संख्येने उपस्थित होता. यावेळी वसंतलाल गूगळे, चंदूलाल कोठारी,रमेश गुगळे,आनंद गुगळे ,जितेंद्र गुगळे ,अनुराग गुगळे व गुगळे परिवार उपस्थित होता .
 यावेळी बोलताना शांतीलाल गुगळे म्हणाले,  मला माझ्या आई वडिलांच्या नावाने काहीतरी मोठं काम करायची इच्छा होती ती मी संघाचे अध्यक्ष कांतीलाल कोठारी ,संजय कोठारी, विजय गुंदेचा, कांतीलाल भळगट, आसराज बोथरा, प्रशांत बोरा यांच्याकडे बोलून दाखवली. यांनी ताबडतोब होकार देऊन मला काम करण्याची संधी दिली. याबद्दल  सर्व जैन समाजाचा मीआभारी आहे असल्याचे भावना शांतिलाल गूगळे यांनी व्यक्त केली.
    शांतीलाल गुगळे म्हणाले मी सुसज्ज दोन मजली बिल्डिंग माझे वडील स्व. उत्तमचंदजी आणि स्व. सीताबाई गुगळे यांच्या स्मरणार्थ बांधून देण्याचे ठरवले आहे मी लवकरात लवकर काम पूर्ण करून जैन श्रावक संघाच्या स्वाधीन करणार आहे  या वेळी उद्योजक रमेश गुगळे ,अशोक शिंगवी, अशोक चोरडिया,शरद शिंगवी  यांची भाषणे झाली.
      आपल्या दानशूर प्रवृतीसाठी नेहमीच तत्पर असलेले
दानवीर शांतीलालजी गुगळे यांनी जुन्या जैन स्थानकाच्या मालकीची  पाच वर्षापासून मोकळी पडलेली जागा व त्याची समाजासाठी असलेली गरज ओळखून त्या जागेवर जैन समाजासाठी काहीतरी उपयोग व्हावा. असे वाटल्याने त्यांनी त्यांची दोन्ही मुले  आनंद व जितेंद्र यांचा विचार घेऊन शांतीलाल गुगळे यांनी  पिताश्री उत्तमचंदजी गुगळे यांच्या स्मरणार्थ दोन मजली इमारत बांधून देण्याचा निर्णय घेतला व आज दि. २७ जून रोजी जैन श्रावक संघाचे संघाचे अध्यक्ष कांतीलाल कोठारी, सेक्रेटरी दिलीप गुगळे,. पदाधिकारी सामाजिक कार्यकर्ते संजय कोठारी, आसराज बोथरा, प्रशांत बोरा, अभय गांधी, संदीप बोगावत आदींच्या उपस्थितीत दोन मजले पूर्णपणे बांधून देण्याचे सर्वांसमक्ष जाहिर केले होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here