जामखेड प्रतिनिधी
जामखेड न्युज – – (सुदाम वराट)
राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस राजेंद्र कोठारी यांनी आपल्या वाढदिवसानिमित्त जामखेड येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक येथे विविध कार्यक्रमासाठी येणाऱ्या नागरिकांना बसण्यासाठी दोन सिमेंटचे बाकडे देण्यात आले. त्यांचे आज दि. २१ आॅक्टोबर रोजी भारतीय बौद्ध महासभेच्या पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत लोकार्पण करण्यात आले.

यावेळी बौद्धाचार्य गोकुळ गायकवाड, अशोक आव्हाड, संजय वारभोग, भारतीय बौद्ध महासभेच्या सौ.सुरेखा अनिल सदाफुले, सौ.सुरेखा रत्नाकर सदाफुले, माजी श्रामणेर मुकुंद घायतडक, सामाजिक कार्यकर्ते संदेश घायतडक, प्रा.रवि भैलुमे, जयभीम घायतडक, सुनील कांबळे, राजेश फिटर, प्रा.राहुल आहिरे आदी मान्यवर उपस्थित होते.
या कार्यक्रमापुर्वी मान्यवरांच्या उपस्थितीत बौध्द वंदना घेण्यात आली. कार्यक्रमाचे शेवटी प्रा. राहुल अहिरे यांनी सर्वांचे आभार मानले.






