भगव्या ध्वज: आ.रोहित यांचे शरद पवारांकडून कौतुक. ‘पवार’ जे करतात त्याच्या कडे सर्वांचे लक्ष असते,

0
246
जामखेड न्युज – – – 
 ‘पवार’ जे करतात त्या कडे इतरांचे सगळ्यांचेच लक्ष असते. त्यामुळे आम्हा पवारांना कुठल्या कार्यक्रमाची जाहिरात करण्याची गरजच पडत नाही; असे मिश्किल वक्तव्य राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी केले आहे.
पिंपरी (पुणे) इथे झालेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. आपले नातू आ.रोहित पवार यांनी आपल्या मतदारसंघात खर्डा इथे सर्वात उंच असा भगवा ध्वज उभारलाय, त्यामुळे राष्ट्रवादी पक्ष भगव्या कडे वळतोय का? असा प्रश्न विचारला असता, शरद पवारांनी ‘पवार’ जे काही करतात त्या कडे सर्वांचे लक्ष असते, त्याचा आम्हाला फायदाही असा होतो की आमची प्रसिद्धी कुठलीही जाहिरात न करता होते. हे सांगतानाच पवारांनी आ.रोहित पवार यांच्या भगवा स्वराज्य ध्वज संकल्पना विषद करत आ.रोहित यांचे समर्थन केले.
भगवा ध्वज हा छत्रपती शिवाजी महाराजांच्या रयतेच्या स्वराज्याचे प्रतीक आहे. त्याग, समता,समर्पण, निष्ठा ही आपली संस्कृती आहे. भगव्या कडे संकुचित वृत्तीने न पाहता व्यापक दृष्टीने पाहिले पाहिजे. आपला इतिहासात भगव्या ध्वजाला महत्व आहे, त्यामुळे याकडे कोणी वेगळ्या दृष्टिकोनातून पाहू नये असे शरद पवार म्हणाले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here