लोकप्रिय आमदार रोहित (दादा) पवारांच्या वाढदिवसानिमित्त खर्डा येथिल सितारामगडावर हभप पुरुषोत्तम महाराज याचे हरिकिर्तन

0
258

जामखेड प्रतिनिधी

                 जामखेड न्युज – – ( सुदाम वराट )

महाराष्ट्राचे तरुण तडफदार युवा नेतृत्व कर्जत-जामखेडचे आमदार रोहित  (दादा) पवार यांच्या वाढदिवसानिमित्त श्री क्षेत्र सितारामगड खर्डा येथे महाराष्ट्राचे प्रसिद्ध किर्तनकार आवाजाचे जादुगार (माय माझी मायेचा सागर) गीत गाणारे हभप पुरूषोत्तम महाराज यांचे हरिकिर्तन बुधवार दिनांक २९ सप्टेंबर रोजी सायंकाळी ८ ते १० या वेळेत होईल तर आमदार रोहित (दादा)  पवार यांचा अभिष्ठचिंतन सोहळा ६ ते ८ या वेळेत होईल तरी या कार्यक्रमाचा लाभ भाविक भक्तांनी घ्यावा असे आवाहन कार्यक्रमाचे आयोजन साकतचे सरपंच हनुमंत पाटील यांनी केले आहे.
     यावेळी आखिल भारतीय वारकरी संघाचे राष्ट्रीय अध्यक्ष हभप प्रकाश महाराज बोधले, गडाचे मठाधिपती हभप महालिंग महाराज, हभप रामकृष्ण महाराज रंधवे, हभप कैलास महाराज भोरे, हभप महेबूब महाराज शेख हे मान्यवर उपस्थित राहणार आहेत.
    किर्तनाच्या माध्यमातून समाजप्रबोधन करत सांप्रदायिक वारसा टिकवून ठेवणारे तालुक्यातील किर्तनकार, संगित विशारद, मृदंगविशारद या मान्यवरांचा सन्मान करण्यात येणार आहे.
   हभप रणजित महाराज, हभप परमेश्वर महाराज खोसे, हभप महादेव महाराज रासकर, हभप कांताबाई महाराज, हभप उत्तम महाराज वराट, हभप विश्वनाथ महाराज नन्नवरे, हभप अशोक महाराज भाकरे, हभप राजेंद्र महाराज झेंडे, हभप बाळासाहेब महाराज गाडे, हभप भागिरथ महाराज ढवळे, हभप बाबा महाराज ढवळे, हभप दिपक महाराज वायसे, हभप दिपक महाराज भोंडवे, हभप बाबा महाराज ढवळे, हभप दादा महाराज रंधवे, हभप अंकुश महाराज पवार, हभप रघुनाथ महाराज, हभप बिभिषण महाराज अंदुरे, हभप हरिभाऊ महाराज गिते, हभप संपत महाराज जायभाय, हभप अप्पासाहेब महाराज गोपाळघरे, हभप राजाभाऊ महाराज किंबहुने, हभप रावसाहेब गव्हाणे, हभप आदेश महाराज दणाणे, हभप नामदेव महाराज पाठक, हभप भाऊसाहेब महाराज मोरे, हभप वैजीनाथ महाराज खोत, हभप मोहन महाराज जाधव, हभप नाना महाराज काशिद, हभप पोपट महाराज हुलगुंडे, हभप मधुकर महाराज यादव
  तर संगित विशारद (गायक)  हरिभाऊ महाराज काळे, बिभिषण महाराज कोकाटे, मुकुंद महाराज भवर, हभप विशाल महाराज खरसाडे, हभप बाळासाहेब महाराज सुरवसे, हभप श्रीराम महाराज गिते, हभप अनिल महाराज महाकले,
  मृदंगविशारद म्हणून आसाराम महाराज साबळे, अंगद महाराज होडशीळ, हभप भिमराव महाराज मुरुमकर, हभप बाबा महाराज मुरुमकर या सर्व मान्यवरांचा किर्तन, मृदंग व संगित क्षेत्रातील महत्त्वाच्या योगदानाबद्दल सत्कार करण्यात येणार आहे.
वरील सर्व कार्यक्रमाचा लाभ पंचक्रोशीतील नागरिकांनी घ्यावा असे आवाहन कार्यक्रमाचे आयोजक साकतचे सरपंच राष्ट्रवादी काँग्रेसचे युवा नेते हनुमंत पाटील यांनी केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here