आमदार रोहित पवार हे विकासाचे व्हिजन असलेले नेते – प्रसाद ढोकरीकर

0
170

जामखेड प्रतिनिधी

           जामखेड न्युज – – (सुदाम वराट)
      आमदार रोहित पवारांच विकासाचे व्हिजन खुपच मोठे आहे. त्यांच्या कामाच्या पद्धतीवर प्रभावित होऊन विकासाला साथ देण्यासाठी कोणत्याही दबावाखाली नाही तर स्व – इच्छेने विकासाला साथ देण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस मध्ये प्रवेश केलेला आहे. तसेच येणा-या पालिका निवडणुकीत कर्जत-जामखेड मध्ये राष्ट्रवादी काँग्रेसची सत्ता येणार आहे असे प्रसाद ढोकरीकर यांनी सांगितले.
      काही दिवसांपूर्वी आमदार रोहित पवारांच्या उपस्थितीत भाजपाचे निष्ठावान नेते प्रसाद ढोकरीकर व इतर चार जणांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता. त्या अनुषंगाने ते आज जामखेड येथे पत्रकारांशी बोलत होते. यावेळी बोलताना ते म्हणाले की, आमदार रोहित पवार हेच कर्जत-जामखेडचा विकासानी कायापालट करू शकतात. त्या दृष्टीने त्यांचे काम सुरू आहे. आतापर्यंत केलेल्या कामांमुळे मी प्रभावित झालो व पक्ष प्रवेश केला पक्षापेक्षा विकास महत्त्वाचा आहे.
      स्वप्नातील कर्जत-जामखेड उभे राहण्यासाठी विकासाला साथ देण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे असे ढोकरीकर यांनी सांगितले. तसेच येणा-या नगरपरिषद व नगरपालिका निवडणुकीत कर्जत-जामखेड मध्ये राष्ट्रवादी काँग्रेसची सत्ता येणार आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here