जामखेड प्रतिनिधी
जामखेड न्युज – – (सुदाम वराट)
जामखेड तालुक्यातील एकमेव प्रकल्प खैंरी मध्यम प्रकल्प दि. १३ सप्टेंबर रोजी क्षमतेणे भरल्याने लाभक्षेत्रातील शेतकऱ्यांमध्ये समाधान पसरले आहे.
साधारण जामखेड तालुक्यातील सातेफळ, वाकी, लोणी, बाळगव्हाण, दौंडवाडी, आपटी, खर्डा, तरडगाव, सोनगाव, धनेगाव, तर उस्मानाबाद जिल्हा परांडा तालुक्यातील चिंचपूर बुद्रुक व पांढरेवाडी शिवारातील शेकडो शेतकऱ्यांना या प्रकल्पातून शेतीसाठी पाणी दिले जाते. तसेच सन २०१५ – २०१६ साली निर्माण झालेल्या तिव्र पाणीटंचाईच्या पार्श्वभूमीवर जामखेड शहरासह तालुक्यातील अनेक गावांनाही याच प्रकल्पातून पाणी पुरवठा केला होता.
अशा या खैंरी मध्यम प्रकल्पाचा माजी मंत्री, व भाजपचे राज्य उपाध्यक्ष प्रा. राम शिंदे यांचे हस्ते खैरी मध्यम प्रकल्प जलपूजन सोहळा मान्यवर उपस्थितीत पार पडला. यावेळी पंचायत समितीचे माजी सभापती व विद्यमान सदस्य डाॅ. भगवानराव मुरुमकर, भाजपाचे कर्जत-जामखेड विधानसभा क्षेत्र प्रमुख रवींद्र सुरवसे, जिल्हा परिषद सदस्य सोमनाथ पाचरणे, प्रविण चोरडीया, वैजीनाथ पाटिल, पांडुरंग उबाळे, युवा मोर्चा तालुकाध्यक्ष पै. शरद कार्ले, माजी नगराध्यक्ष सोमनाथ राळेभात, युवा मोर्चाचे तालुका उपाध्यक्ष मोहनमामा गडदे, भागवत दादा सुरवसे, राम भोसले, जिल्हा सरचिटनिस, महेश मासाळ, सातेफळचे सरपंच गणेश लटके, तरडगावचे सरपंच डॉ. जयराम खोत, वाकीचे सरपंच नाना वायकर, उपसरपंच भानुदास धावडे, बाळासाहेब खाडे, आण्णा वायसे, नाना गोपाळघरे, बाजीराव गोपाळघरे, बाळासाहेब गोपाळघरे, राजु मोरे, गणेश शिंदे, प्रशांत कांबळे, पप्पु दिंडोरे, मदन पाटिल, कांतीलाल डोके, तरडगाव, सातेफळ, वाकी, दौडाचीवाडी, लोणीचे सरपंच, ग्रा पं सदस्य, व ग्रामस्थ, भाजपा पदाधीकारी उपस्थित होते.
यावेळी जामखेड न्युजशी बोलताना प्रा. शिंदे म्हणाले की, जलसंधारणाच्या कामामुळेच या परिसराचा कायापालट झाला आहे. मंत्री आसताना संपुर्ण राज्यात जलसंधारणाची दर्जेदार कामे झाली त्यामुळे पाणी टंचाईवर मात झाली आहे.










