जामखेड प्रतिनिधी
जामखेड न्युज – – (सुदाम वराट)
आदर्श शिक्षक पुरस्कार प्राप्त मा. पांडुरंग मोहळकर साहेबांचा सत्कार आज श्री साकेश्वर विद्यालयातर्फे सत्कार करण्यात आला.
पांडुरंग मोहळकर हे जिल्हा परिषद शाळा पाडळी येथे पदवीधर शिक्षक म्हणून कार्यरत आहेत त्यांच्या नियोजनबद्ध कामामुळे त्यांना साकत केंद्राचे केंद्रप्रमुख म्हणूनही अतिरिक्त पदभार देण्यात आला आहे. जामखेड तालुक्यातून आदर्श शिक्षक पुरस्कार प्राप्त झाला याबद्दल त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
सेतु अभ्यासक्रम आॅनलाईन उत्तर चाचणी सर्व्हेक्षण करण्यासाठी आज ते साकेश्वर विद्यालयात आले होते. चाचणी सर्व्हेक्षण काम झाल्यानंतर विद्यालयातर्फे त्यांचा सत्कार करण्यात आला.

यावेळी उदयकुमार दाहितोडे, राजकुमार थोरवे, सुदाम वराट, महादेव मत्रे, अशोक घोलप, सुलभा लवुळ, शिक्षकेतर संघटनेचे जिल्हा खजिनदार विजयकुमार हराळे, अतुल दळवी, आण्णा विटकर, सरोदे आण्णा यांच्या सह अनेक मान्यवर व विद्यार्थी उपस्थित होते.
यावेळी जिल्हा शिक्षकेतर संघटनेचे खजिनदार विजयकुमार हराळे यांनी जामखेड तालुका शिक्षकेतर संघटना व जिल्हा शिक्षकेतर संघटनेच्या वतीने मोहळकर साहेबांचे अभिनंदन केले.









