Sunday, February 15, 2026
Home ताज्या बातम्या सामाजिक कार्यकर्ते संजय कोठारी व माजी सरपंच सुनिल कोठारी यांना पितृश्वोक –...

सामाजिक कार्यकर्ते संजय कोठारी व माजी सरपंच सुनिल कोठारी यांना पितृश्वोक – मनसुखलाल कोठारी यांचे वृद्धापकाळाने दु:खद निधन

0
280
जामखेड प्रतिनिधी 
        जामखेड न्युज 
जामखेड येथील प्रसिद्ध व्यापारी व जामखेड विविध कार्यकारी सहकारी संस्थेचे माजी चेअरमन मनसुखलाल सुवालाल कोठारी वय ८३ वर्षे यांचे आज दि. १२ रोजी ११.४५ वाजता निधन झाले त्यांच्यावर जामखेड येथील तपनेश्वर अमरधाम येथे सायंकाळी ५.३० वा. अंत्यसंस्कार
करण्यात येणार आहेत. अंत्ययात्रा सुनील कोठारी यांचे निवासस्थाना पासून निघेल  मनसुखलाल कोठारी हे जामखेड विविध कायँकारी सोसायटीचे पस्तीस वर्षे चेअरमन होते या काळात त्यांनी शेतकऱ्यांना आर्थिक मदत मोठ्या प्रमाणावर  केली तसेच जामखेड ग्रामपंचायतते दहा वर्षे सदस्य होते या काळात त्यांनी सर्वसामान्यांची सेवा केली.
त्यांच्या मागे पत्नी माजी सरपंच व पत्रकार सुनील कोठारी सामाजिक कार्यकर्ते संजय कोठारी पारस कोठारी ही तीन मुले तर सुशिला बलदोटा एक मुलगी सुना नातवंडे असा परिवार आहे
त्याचा उठावना दि १३ रोजी जामखेड येथील जैन स्थानकात सकाळी आकरा वाजता होणार आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

error: Content is protected !!