जामखेड प्रतिनिधी
जामखेड न्युज – – (सुदाम वराट)
तालुक्यातील खर्डा येथिल पत्रकार दत्तराज पवार
यांची मुलगी निकिता पवार ही बार्शी, जिल्हा सोलापूर येथील भगवंत इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी या कॉलेजमध्ये शिक्षण घेत होती ती सिव्हिल इंजिनिअर च्या शेवटच्या वर्षात शिकत होती, महाराष्ट्र स्टेट बोर्ड ऑफ टेक्निकल एज्युकेशन ने घेतलेल्या परीक्षेत तिला 90. 52 टक्के गुण
मिळवून यश संपादन केले आहे.
तिच्या यशाबद्दल खर्डा व परिसरातुन अभिनंदन वर्षाव होत आहे, निकिता पवार हिला कॉलेजचे प्राचार्य ए.के. देशमाने सर, पाटील सर व सरवदे सर यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले आहे.
संस्थेचे अध्यक्ष आमदार तानाजी सावंत व माजी मंत्री दिलीप सोपल व आमदार रोहितदादा पवार व तालुक्यातील पत्रकार बांधवांनी निकिता पवार हिच्या यशाबद्दल अभिनंदन केले आहे.









