Sunday, February 15, 2026
Home ताज्या बातम्या शिक्षणाची गंगा ग्रामीण भागात रुजविण्यासाठी अविरत काम करणाऱ्या ऋषितुल्य व्यक्तीमत्वाचा ल. ना....

शिक्षणाची गंगा ग्रामीण भागात रुजविण्यासाठी अविरत काम करणाऱ्या ऋषितुल्य व्यक्तीमत्वाचा ल. ना. होशिंग विद्यालयात सत्कार संपन्न

0
335

जामखेड प्रतिनिधी

                जामखेड न्युज – – (सुदाम वराट) 

ज्या महान व्यक्तींनी जनकल्याणासाठी आपले आयुष्य खर्ची घातले शिक्षणाची गंगा ग्रामीण भागात नेली विनाअनुदानित काळात मोठय़ा प्रमाणावर कष्ट घेऊन शाळा चालविल्या यामुळेच संस्थेचा वटवृक्ष निर्माण झाला आहे. असे मत प्राचार्य श्रीकांत होशिंग यांनी व्यक्त केले.

        ल. ना. होशिंग माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात संस्थेच्या योगदानात महत्त्वाचा वाटा असणार्‍या ऋषितुल्य व्यक्तीमत्वाचा ऋषिपंचमीनिमित्त सत्कार समारंभ आयोजित करण्यात आला होता. कार्यक्रमाचे अध्यक्ष दि. पिपल्स एज्युकेशन सोसायटीचे उपाध्यक्ष अरुणशेठ चिंतामणी होते. तर प्रमुख पाहुणे म्हणून संस्थेचे सचिव शशिकांत देशमुख, खजिनदार राजेशजी मोरे, प्राचार्य श्रीकांत होशिंग, जामखेड महाविद्यालय जामखेडचे उपप्राचार्य सुनिल नरके,
न्यू इंग्लिश स्कूल राजुरी मुख्याध्यापक जुल्फिकार पठाण, भैरवनाथ विद्यालयाचे प्राचार्य एस. एन. पारखे, ज्येष्ठ माजी शिक्षक रमेश अंबिलवादे, रमेश चांदेकर, हळगावचे ज्येष्ठ नेते किसनराव ढवळे, साकतचे ज्येष्ठ नागरिक ज्ञानदेव मुरुमकर, दिनकर कुलकर्णी, यादव कल्याणकर, विलास चिंतामणी, बाळासाहेब होशिंग, उपमुख्याध्यापक श्रीधर जगदाळे, पर्यवेक्षक रमेश अडसूळ, राजेंद्र ढवळे, सुभाष कापसे यांच्या सह अनेक मान्यवर उपस्थित होते.
      यावेळी बोलताना प्राचार्य होशिंग म्हणाले की, आज संस्थेचा जो वटवृक्ष झाला आहे त्यात साकत येथे मुरूमकर, वराट, हळगावला ढवळे, होशिंग , तर राजुरीला फुंदे, गुंदेचा व काळदाते यांचे योगदान महत्त्वाचे आहे. त्यांच्या व ग्रामस्थांच्या सहकार्याने आज संस्थेचा वटवृक्ष उभा आहे. त्यामुळे गावातील सहकार्य करणार्‍या ऋषितुल्य व्यक्तीमत्वाचा सत्कार आयोजित करण्यात आला आहे.
      संस्थेचे सचिव शशिकांत देशमुख यांनी बोलताना सांगितले की, व्यासपीठावरील व्यक्तींचा आदर्श आपण सर्वांनी घ्यावा भविष्यात आपलाही उत्कर्ष होईल.
        उपमुख्याध्यापक श्रीधर जगदाळे यांनी मनोगत व्यक्त करताना सांगितले की, व्यासपीठावरील हे सात मान्यवर म्हणजे साक्षात ऋषि आहेत. त्यांच्या कार्याबद्दल सविस्तर माहिती सांगितली
डी. बी. कुलकर्णी यांनी बोलताना सांगितले की, साकत, हळगाव व राजुरी येथिल ग्रामस्थांचे सहकार्य अनन्यसाधारण सहकार्य लाभले आहे.
कार्यक्रमाचे अध्यक्ष अरुणशेठ चिंतामणी नाविन्यपूर्ण उपक्रम राबविल्या बद्दल संस्थेतर्फे प्राचार्य होशिंग सरांचे कौतुक केले.
कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सांस्कृतिक विभाग प्रमुख संजय कदम यांनी मेहनत घेतली कार्यक्रमाचे  सुत्रसंचलन अनिल देडे. यांनी केले तर आभार पर्यवेक्षक रमेश अडसूळ यांनी मानले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

error: Content is protected !!