जामखेड न्युज – – –
कोरोनाने संपूर्ण जगात धुमाकूळ घातला. अनेक देशांची आर्थिक, आरोग्य यंत्रणा कोलमडून पडली. कोरोनाग्रस्तांच्या संख्येने तब्बल 21 कोटींचा टप्पा पार केला असून लाखो लोकांचा मृत्यू झाला आहे. कोरोनाच्या कहरापासून अमेरिकेसारखा प्रगत देश देखील वाचू शकला नाही.
सध्या महासत्ता असलेल्या अमेरिकेतही कोरोनाने तांडव घातले आहे. या ठिकाणची परिस्थिती विदारक आहे.
अमेरिकेत शाळा सुरु होताच कोरोनाच्या रुग्णांमध्ये मोठी वाढ दिसून आली आहे. ऑगस्टच्या शेवटच्या आठवड्यात अमेरिकेत अडीच लाखांहून अधिक मुले कोरोना पॉझिटिव्ह झाले आहेत.
तर एक महिन्यात संक्रमित होणाऱ्या शाळकरी विद्यार्थ्यांची संख्या साडे सात लाखांवर पोहोचली आहे. यामुळे अमेरिकेचे हेल्थ एक्सपर्टने यावर चिंता व्यक्त केली आहे.
अमेरिकन अकादमी ऑफ पीडियाट्रिक्सने एका अहवालात ही माहिती दिली आहे. यामध्ये ऑगस्टच्या शेवटच्या आठवड्यात 2.5 लाखांहून अधिक मुले कोरोनाग्रस्त झाली आहेत.
कोरोना महामारी सुरु झाल्यापासून आजवरच्या बाल उपचार संख्येतील हा उच्चांकी आकडा असल्याचे यामध्ये म्हटले आहे. तसेच दोन आठवड्यांत 10 टक्क्यांची वाढ दिसून आली आहे.
या काळात अमेरिकेत 10 लाखांहून अधिक कोरोना रुग्ण सापडले आहेत. अमेरिकेत आता पुन्हा कोरोनाचा विस्फोट झाला आहे.
एका दिवसात कोरोनाचे तब्बल 1 लाखांहून अधिक नवे रुग्ण आढळून आले आहेत. डेल्टा व्हेरिएंटने चिंता वाढली आहे.
पुन्हा एकदा कोरोना रुग्णांच्या संख्येत मोठा वाढ होत असलेली पाहायला मिळत आहे. अमेरिकेतील फ्लोरिडा हे कोरोनाचं हॉटस्पॉट झालं आहे.
न्यूज एजन्सी एपीच्या रिपोर्टनुसार, मध्य फ्लोरिडामध्ये कोरोनामुळे मोठ्या संख्येने लोकांचा मृत्यू झाला आहे. ज्यामुळे रुग्णालयाच्या शवागृहात मृतदेहांसाठी जागाच शिल्लक नाही. शवागृहात मृतदेहांचा खच पाहायला मिळत असून गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे.









