हिंदुस्थानात राहणारे सर्व हिंदूच – हिंदू-मुस्लीम यांचे पूर्वज एकच; पण ब्रिटिशांनी भांडण लावून दिलं – मोहन भागवत

0
405
जामखेड न्युज – – – 
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी हिंदू आणि मुस्लिमांबद्दल मोठे विधान केले आहे. ते म्हणाले की हिंदू आणि मुस्लिमांचे पूर्वज एकच होते आणि प्रत्येक भारतीय नागरिक हिंदू आहे. पुण्यात ग्लोबल स्ट्रॅटेजिक पॉलिसी फाउंडेशन आयोजित एका कार्यक्रमात बोलताना ते म्हणाले की, समंजस मुस्लिम नेत्यांनी अतिरेक्यांच्या विरोधात खंबीरपणे उभे राहिले पाहिजे.
“भारतात हिंदुंसोबत राहिलं तर काहीच मिळणार नाही. फक्त हिंदूंचीच निवड केली जाईल आणि इस्लाम धर्म संपुष्टात येईल असा गैरसमज ब्रिटिशांनी मुस्लिम नागरिकांमध्ये निर्माण केला. यातूनच हिंदू-मुस्लिम यांच्यात शत्रुत्व निर्माण करण्याचं काम ब्रिटिशांनी केलं”, असं विधान मोहन भागवत यांनी केलं आहे.
ब्रिटिशांनी भारतात एक गैरसमजूतीचं वातावरण निर्माण केलं. हिंदू आणि मुस्लिमांमध्ये एकमेकांबद्दल द्वेष निर्माण होईल अशी माहिती पसरवली. वेगळ्या राष्ट्राच्या मागणीसाठी त्यांनी मुस्लिमांना प्रवृत्त केलं. इस्लाम धर्म भारतातून नष्ट होईल असं सांगितलं गेलं. पण तसं झालंय का? तर नाही. मुस्लिमांना आज सर्व स्तरांमध्ये हक्काचं स्थान आहे, असं मोहन भागवत म्हणाले.
हिंदूंचे कोणाशीही वैर नाही : भागवत
मोहन भागवत म्हणाले की, भारतातील अल्पसंख्याक समुदायाला कशाचीही भीती बाळगण्याची गरज नाही, कारण हिंदूंचे कोणाशीही वैर नाही. ते म्हणाले, ‘हिंदू शब्द मातृभूमी, पूर्वज आणि भारतीय संस्कृतीच्या बरोबरीचा आहे. इतर मतांचा तो अनादर नाही. आपल्याला मुस्लिम वर्चस्वाचा नाही तर भारतीय वर्चस्वाचा विचार करावा लागेल. भारताच्या सर्वांगीण विकासासाठी सर्वांनी एकत्र काम केले पाहिजे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here