जामखेड प्रतिनिधी
जामखेड न्युज – – (सुदाम वराट)
महिला व बाल विकास विभाग यांचे कडून देण्यात येणाऱ्या सेवांबाबत तसेच बालकांच्या विकासासाठी आवश्यक माहिती मिळवण्यासाठी 8080809063 क्रमांकावर फोन करा तसेच वरील क्रमांकावर whats app मेसेज करा, तालुक्याचे व जिल्ह्याचे नाव व्यवस्थित टाका व आवश्यक ती सर्व माहिती मिळवा असे आवाहन बालविकास प्रकल्प अधिकारी श्रीमती ज्योती बेल्हेकर यांनी केले आहे .

तरंग सुपोषित महाराष्ट्राचा सक्षम माता आणी सुदृढ बालक घडवेल सुपोषित महाराष्ट्र अंतर्गत विविध प्रकारची माहिती फोन द्वारे मेसेज पाठवून किंवा क्यूआर कोड स्कॅन करून माहिती मिळवता येणार आहे. २) कोविड १९ संबंधित माहिती. २) अंगणवाडी केंद्राच्या सेवा ३) बाळासाठी पौष्टिक चवदार पाककृती ४) गर्भवती मतांची काळजी ५) स्तनदा मातांची काळजी ६) ०- ३ वयोगटातील बाळांचा सर्वागीण विकास ७) स्वच्छतेच्या सवयी व अतिसार ८) किशोरवयीन मुलींचे आरोग्य व पोषण ९) ३ – ६ वयोगटातील मुलांचे पूर्व शालेय शिक्षण ही सर्व माहिती मिळवण्यासाठी मोबाईल मधील कॅमेरा उघडून क्यू आर कोड स्कॅन करा किंवा Whats App वर 8080809063 मेसेज करा किंवा फोन करा आपणास वरील प्रकारची माहिती ताबडतोब मिळेल असे बालविकास प्रकल्प अधिकारी श्रीमती ज्योती बेल्हेकर यांनी सांगितले




