Saturday, February 14, 2026
Home ताज्या बातम्या आगामी सण-उत्सवाच्या पार्श्वभूमीवर जामखेड पोलीस स्टेशनच्या वतीने मॉक ड्रिलचे प्रात्यक्षिक

आगामी सण-उत्सवाच्या पार्श्वभूमीवर जामखेड पोलीस स्टेशनच्या वतीने मॉक ड्रिलचे प्रात्यक्षिक

0
227
जामखेड प्रतिनिधी 
          जामखेड न्युज – – (सुदाम वराट) 
आगामी गणेश उत्सवासह येणाऱ्या विविध सण-उत्सवाच्या पार्श्वभूमीवर जामखेड पोलीस स्टेशनच्या वतीने दंगा नियंत्रण व जमाव पांगविण्यासाठी करण्यात येणाऱ्या योजनांची रंगीत तालीम करण्यात आली. पोलीस स्टेशन मध्ये फोन येतो की जामखेड बसस्थानकावर  काही टारगट मुलांनी जमाव केलेला असुन त्यांच्यात वाद सुरू आहे. दोन समाजामध्ये तेढ निर्माण होवुन मोठा दंगा होण्याची शक्यता आहे. तुम्ही तात्काळ या ठिकाणी पोलीस पाठवा असा. फोन खाली ठेवताच आॅन ड्युटी ठाणे अंमलदार तात्काळ ही माहिती पोलीस निरीक्षक यांना देतात व उपलब्ध कर्मचाऱ्यांना घेऊन त्यांनी तात्काळ पोलीस  बसस्थानकावर  पोहोचतात. त्यावेळी तेथे जमलेल्या तसेच आजुबाजुला जमलेल्या लोकांना पोलीस इतक्या लवकर कोठे चालले आहेत याची चाहुल लागते. मात्र बसस्थानकावर पोहोचल्यावर कळते की कोणतीही अनुचित घटना न घडताआगामी गणेश उत्सव तसेच येणारे विविध सण उत्सवाच्या पार्श्वभूमीवर इतर सण जामखेड पोलीस स्टेशनच्या वतीने दंगल नियंत्रण व जमाव नियंत्रण योजनेची रंगीत तालीम सूरू आहे.
 उद्भवलेल्या प्रसंगाला तात्काळ सामोरे जाणेसाठी तातडीने कशी उपाययोजना करायच्या हे प्रात्यक्षिक सादर करण्यासाठी २ पोलीस अधिकारी व २५ पोलीस अंमलदार तात्काळ उपलब्ध झाले होते.त्यानंतर तेथेच मॉब डिस्पोझलचे प्रात्यक्षिक घेण्यात आले. जमाव पांगविण्यासाठीचे प्रात्यक्षिक पोहेकॉ.रमेश फुलमाळी यांनी पध्दतशीरपणे करून दाखवले
 यावेळी पोलीस निरीक्षक संभाजी गायकवाड संभाजी गायकवाड, सपोनि.सुनिल बडे ,व २५  पोलीस कर्मचारी उपस्थित होते, यावेळी १ डमी राऊंड फायर करण्यात आला आहे. तसेच सौम्य लाठीमार ही करण्याचा सराव करण्यात आला आहे.
प्रतिक्रिया..
एखादी घटना घडलेवरून तात्काळ पोलीसांचा प्रतिसाद मिळण्यासाठी तसेच येणा-या अडचणी जाणुन घेण्यासाठी दंगा काबु योजना व मॉक ड्रिलचे प्रात्यक्षिक करण्यात आले या प्रात्यक्षिकाला सर्वांचा चांगला प्रतिसाद  मिळाला असुन तसेच इतर अधिकारी यांचीही मदत वेळेवर मिळाली. यावरून दंगा काबु योजना राबविताना येणा-या अडचणी लक्षात घेता वाढत्या लोकसंख्येच्या अनुषंगाने भविष्यात तालुक्यासाठी आणखी पोलीस संख्याबळाची आवश्यकता भासत आहे.
_संभाजी गायकवाड
पोलीस निरीक्षक, जामखेड

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

error: Content is protected !!