साकेश्वर मोटर्स व वराट मोटर्सचा नावलौकिक संपूर्ण देशात होईल – प्रा. मधुकर राळेभात

0
244

जामखेड प्रतिनिधी

            जामखेड न्युज – – (सुदाम वराट) 
जिद्द, चिकाटी व मेहनत तसेच प्रामाणिकपणे कष्ट करत राहिल्यामुळे आज वराट मोटर्सचे वटवृक्षात रूपांतर झाले आहे. आता या साकेश्वर मोटर्स व वराट मोटर्सचे जिल्ह्यात नव्हे तर देशात नावलौकिक होईल असा विश्वास प्रा. मधुकर राळेभात यांनी उद्घाटनप्रसंगी व्यक्त केला. आ
     आज वराट मोटर्सच्या जामखेड मध्ये सव्वा एकर जागेत भव्य दिव्य टाटा शोरूमचे उद्घाटन  झाले यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते व कर्जत-जामखेड विधानसभा प्रमुख प्रा. मधुकर राळेभात, पंचायत समितीचे माजी सभापती व कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक संजय वराट, साकतचे सरपंच हनुमंत पाटील, सेवा संस्थेचे अध्यक्ष प्रा. अरुण वराट, सावळेश्वर उद्योग समूहाचे नेते रमेश (दादा) आजबे, हभप उत्तम महाराज वराट, नगरसेवक अमित जाधव, कृषी अधिकारी सुरेश (भाऊ) वराट, पंचायत समितीचे माजी सभापती व विद्यमान सदस्य डॉ. भगवानराव मुरुमकर, जिल्हा परिषद सदस्य सोमनाथ पाचरणे, रमेश अडसुळ, विकास वराट, वराट मोटर्सचे मॅनेजिंग डायरेक्टर राजाभाऊ वराट, हनुमंत वराट, बलभीम वराट, भरत लहाने, राजकुमार थोरवे, रमेश वराट यांच्या सह अनेक मान्यवर उपस्थित होते.
      यावेळी बोलताना प्रा. मधुकर राळेभात म्हणाले की, राजाभाऊ वराट यांचा प्रवास अगदी शुन्यातून विश्व निर्माण करणारा प्रवास आहे. आता त्यांचे नाव संपुर्ण देशात होईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
   यावेळी बोलताना संजय वराट सर म्हणाले की, राजाभाऊ वराट यांनी अहोरात्र परिश्रम घेत जामखेड येथे इंदोर गॅरेज सुरू केले नंतर नगर येथे साकेश्वर मोटर्स व आता टाटा कंपनीच्या सर्व वाहनांची विक्री व दुरुस्ती चे वराट मोटर्स शोरूम सुरू केले आहे. या शोरूम साठी शुभेच्छा दिल्या.
    यावेळी हभप उत्तम महाराज वराट म्हणाले की, आजच्या या भव्य दिव्य शोरूम मागे आजी – आजोबा, आई वडीलांची व कुटुंबांची पुण्याई तसेच राजाभाऊ यांचा निर्व्यसनीपणा व चिकाटी आहे. या बळावर यशाचे शिखर गाठले आहे.
  यावेळी वराट मोटर्सचे मॅनेजिंग डायरेक्टर राजाभाऊ वराट म्हणाले की, टाटा कंपनीच्या सर्व वाहनांची विक्री व दुरुस्तीची सेवा उपलब्ध आहे सर्व स्पेअरपार्ट, ब्रेकडाउन सर्व्हिस उपलब्ध आहे. 2005 पासून अॅटोमोबाईल क्षेत्रात इंदोर गॅरेज नावाने सुरूवात केली नगर येथे 2013 मध्ये साकेश्वर मोटर्स निसान कंपनीचे स्पेअरपार्ट व सर्व्हिस सेवा सुरू केली आज जामखेडमध्ये सव्वा एकर जागेत भव्य दिव्य असे टाटा कंपनीचे शोरूम उभारले आहे. यावेळी अनेक मान्यवरांनी वराट मोटर्सला शुभेच्छा दिल्या.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here