Monday, November 16, 2026
Home ताज्या बातम्या ऐतिहासिक खर्डा नगरीत क्रांतीचा जयघोष! आद्यक्रांतीगुरू लहुजी वस्ताद साळवे जयंती उत्साहात साजरी,...

ऐतिहासिक खर्डा नगरीत क्रांतीचा जयघोष! आद्यक्रांतीगुरू लहुजी वस्ताद साळवे जयंती उत्साहात साजरी, महापुरुषांच्या विचारांनी तरुणांना दिली प्रेरणा! सामाजिक एकतेचा जागर, मान्यवरांची उपस्थिती, साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे जयंती उत्सव समितीच्या वतीने भव्य आयोजन

0
3
ऐतिहासिक खर्डा नगरीत क्रांतीचा जयघोष! आद्यक्रांतीगुरू लहुजी वस्ताद साळवे जयंती उत्साहात साजरी, महापुरुषांच्या विचारांनी तरुणांना दिली प्रेरणा!  सामाजिक एकतेचा जागर, मान्यवरांची उपस्थिती, साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे जयंती उत्सव समितीच्या वतीने भव्य आयोजन

जामखेड न्युज – – – – – 

ऐतिहासिक खर्डा नगरीत क्रांतीचा जयघोष! आद्यक्रांतीगुरू लहुजी वस्ताद साळवे जयंती उत्साहात साजरी, महापुरुषांच्या विचारांनी तरुणांना दिली प्रेरणा!

सामाजिक एकतेचा जागर, मान्यवरांची उपस्थिती, साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे जयंती उत्सव समितीच्या वतीने भव्य आयोजन

जामखेड तालुक्यातील ऐतिहासिक खर्डा नगरीत आद्यक्रांतीगुरू लहुजी वस्ताद साळवे यांची जयंती मोठ्या उत्साहात, जल्लोषात आणि चैतन्यमय वातावरणात साजरी करण्यात आली. थोर क्रांतिकारकांच्या विचारांचा जागर, सामाजिक एकतेचा संदेश आणि तरुणांमध्ये महापुरुषांच्या कार्याची प्रेरणा निर्माण करणारा हा जयंती सोहळा उत्साहात पार पडला.

साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे जयंती उत्सव समिती, खर्डा शहर यांच्या वतीने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. समितीचे शहराध्यक्ष गणेश (भाऊ) जाधव यांनी कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी विशेष पुढाकार घेतला. या सोहळ्याला खर्डा शहरासह परिसरातील प्रतिष्ठित नागरिक, सामाजिक कार्यकर्ते, तरुण कार्यकर्ते आणि पत्रकार बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी वंचित बहुजन आघाडीचे राज्य प्रवक्ते तथा नगरसेवक ॲड. डॉ. अरुण जाधव होते. प्रमुख पाहुणे म्हणून खर्डा पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक अशोक खेडकर, युवा पत्रकार संघाचे माजी पुणे जिल्हाध्यक्ष पत्रकार रिजवान बागवान, सामाजिक कार्यकर्ते तथा पत्रकार भगवान राऊत, निवारा बालगृहाचे अधीक्षक संतोष चव्हाण, माजी ग्रामपंचायत सदस्य दीपक जावळे, अमोल नवले, लोकअधिकार आंदोलनाचे तालुकाध्यक्ष विशाल पवार, शकुरभाई शेख, सलीमभाई मदारी, अलिशेरभाई कुरैशी, पत्रकार आशुतोष गायकवाड, सोनाजी सुरवसे आणि सामाजिक कार्यकर्ते दादा मोरे आदी मान्यवर उपस्थित होते.

कार्यक्रमाच्या प्रारंभी मान्यवरांच्या हस्ते महापुरुषांच्या प्रतिमांना पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. यावेळी आद्यक्रांतीगुरू लहुजी वस्ताद साळवे यांच्या कार्याचे स्मरण करून त्यांच्या क्रांतिकारी विचारांना उजाळा देण्यात आला.

अध्यक्षीय भाषणात ॲड. डॉ. अरुण जाधव यांनी महापुरुषांचे जीवनकार्य, त्यांचे सामाजिक योगदान आणि आद्यक्रांतीगुरू लहुजी वस्ताद साळवे यांच्या ऐतिहासिक कार्याची सविस्तर माहिती उपस्थितांना दिली. लहुजी वस्ताद साळवे यांनी समाजात स्वाभिमान, शौर्य, संघटन आणि देशभक्तीची भावना जागृत करण्यासाठी दिलेले योगदान महत्त्वपूर्ण असल्याचे त्यांनी सांगितले. महापुरुषांचे विचार केवळ जयंतीपुरते मर्यादित न ठेवता ते आपल्या आचरणात आणणे हीच त्यांना खरी आदरांजली ठरेल, असे आवाहन त्यांनी केले. विशेषतः तरुणांनी महापुरुषांच्या विचारांचा वारसा जपत सामाजिक परिवर्तनासाठी पुढाकार घ्यावा, असेही त्यांनी नमूद केले.

या कार्यक्रमातून सामाजिक सलोखा, बंधुभाव आणि महापुरुषांच्या विचारांचा प्रसार करण्याचा संदेश देण्यात आला. कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन लोकअधिकार आंदोलनाचे तालुकाध्यक्ष विशाल पवार यांनी केले.

याप्रसंगी विलास जाधव, भरत येवले, कैलास सकट, युवराज अडागळे, कांतिलाल जाधव, तय्यबभाई मुजावर, लखन जाधव, जयवंत गायकवाड, संतोष डाडर, सचिन जाधव, राहुल ढाले, शंकर गायकवाड, रवि देशमाने, किरण गायकवाड, अमोल अडागळे, समाधान जाधव, आतिष जाधव, ऋषी शिंदे, शिवा मोरे, निखिल अडागळे, रेहान मदारी, अल्ताफ मदारी, अलीम मदारी, चैतन्य गायकवाड आणि सम्राट शिंदे यांच्यासह खर्डा शहर व परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
महापुरुषांच्या विचारांचा जागर आणि सामाजिक एकतेचा संदेश देत ऐतिहासिक खर्डा नगरीत हा जयंती सोहळा उत्साहात संपन्न झाला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

error: Content is protected !!