Wednesday, November 11, 2026
Home ताज्या बातम्या भूतवाडा-लेहनेवाडीत बिबट्याचा धुमाकूळ! दीड वर्षांच्या कालवडीवर हल्ला, पशुसंवर्धन व वनविभागाकडून पाहणी व...

भूतवाडा-लेहनेवाडीत बिबट्याचा धुमाकूळ! दीड वर्षांच्या कालवडीवर हल्ला, पशुसंवर्धन व वनविभागाकडून पाहणी व पंचनामा! जखमी पशुधनाची अधिकाऱ्यांकडून प्रत्यक्ष पाहणी, पशुपालकांना बिबट्यापासून बचावासाठी सतर्कतेच्या सूचना!

0
2
भूतवाडा-लेहनेवाडीत बिबट्याचा धुमाकूळ! दीड वर्षांच्या कालवडीवर हल्ला, पशुसंवर्धन व वनविभागाकडून पाहणी व पंचनामा!  जखमी पशुधनाची अधिकाऱ्यांकडून प्रत्यक्ष पाहणी, पशुपालकांना बिबट्यापासून बचावासाठी सतर्कतेच्या सूचना!

जामखेड न्युज – – – – – – 

भूतवाडा-लेहनेवाडीत बिबट्याचा धुमाकूळ! दीड वर्षांच्या कालवडीवर हल्ला, पशुसंवर्धन व वनविभागाकडून पाहणी व पंचनामा!

जखमी पशुधनाची अधिकाऱ्यांकडून प्रत्यक्ष पाहणी, पशुपालकांना बिबट्यापासून बचावासाठी सतर्कतेच्या सूचना!

जामखेड तालुक्यातील भूतवाडा- लेहनेवाडी परिसरात बिबट्याच्या हल्ल्यात श्री. नितीन दादासाहेब डाडर यांची अंदाजे दीड वर्षे वयाची कालवड जखमी झाली. या घटनेची दखल घेत पशुसंवर्धन विभागाच्या अधिकाऱ्यांनी घटनास्थळी भेट देऊन जखमी पशुधनाची प्रत्यक्ष पाहणी केली तसेच घटनेचा पंचनामा केला.

यावेळी मा. दत्ता मोटेगावकर, सहाय्यक आयुक्त पशुसंवर्धन यांच्यासह वनरक्षक, वनमजूर व स्थानिक लोकप्रतिनिधी उपस्थित होते. संबंधित अधिकाऱ्यांनी घटनास्थळाची पाहणी करून परिस्थितीची माहिती घेतली व आवश्यक पंचनामा प्रक्रिया पूर्ण केली.

दरम्यान, परिसरात बिबट्याचा वावर लक्षात घेता पशुपालकांनी विशेष खबरदारी घ्यावी, असे आवाहन करण्यात आले. जनावरे रात्रीच्या वेळी सुरक्षित गोठ्यात बांधावीत, गोठ्याच्या परिसरात पुरेसा प्रकाश ठेवावा, लहान वासरे व कालवडींना उघड्यावर ठेवू नये तसेच बिबट्या दिसल्यास त्याच्या जवळ जाण्याचा किंवा त्याला हुसकावण्याचा प्रयत्न करू नये, अशा सुरक्षिततेच्या उपाययोजनांची माहिती उपस्थितांना देण्यात आली.

जामखेड तालुक्यात बिबट्याच्या वावरामुळे पशुपालकांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले असून, वनविभाग व पशुसंवर्धन विभागाने परिसरात सतर्कता ठेवून नागरिकांना आवश्यक मार्गदर्शन करावे, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.

बिबट्याच्या वाढत्या वावराच्या पार्श्वभूमीवर शेतकरी व पशुपालकांनी सतर्क राहून आपल्या पशुधनाची काळजी घ्यावी, असे आवाहन यावेळी करण्यात आले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

error: Content is protected !!