जामखेड न्युज – – – – –
जिल्हा बँकेत सचिन घुमरे यांची बिनविरोध बाजी! रत्नदीप शैक्षणिक संकुलाकडून सत्कार

अहिल्यानगर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या पंचवार्षिक निवडणुकीत सेवा संस्था मतदारसंघातून जामखेड तालुक्याचे प्रतिनिधित्व करण्यासाठी सचिन (नाना) घुमरे यांची संचालकपदी बिनविरोध निवड झाल्याबद्दल त्यांच्यावर सर्व स्तरांतून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. या निवडीबद्दल रत्नदीप शैक्षणिक संकुलाच्या वतीने संस्थापक डॉ. भास्कर मोरे पाटील यांनी सचिन घुमरे यांचा यथोचित सन्मान करून त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.

यावेळी मनोज भोरे, प्रा. डॉ. सरफराज खान, प्रा. डॉ. संदीप सांगळे, प्रशांत राळेभात आदी मान्यवर उपस्थित होते. या सन्मानाच्या माध्यमातून सचिन घुमरे यांच्या सहकार क्षेत्रातील नव्या जबाबदारीचे स्वागत करण्यात आले.
युवा नेतृत्वाला सहकार क्षेत्रात संधी; जामखेडच्या दृष्टीने महत्त्वाची घडामोड!
सचिन घुमरे हे उच्चशिक्षित, संयमी, अभ्यासू आणि दूरदृष्टी असलेले युवा नेतृत्व म्हणून ओळखले जातात.

अहिल्यानगर जिल्हा सहकारी बँकेच्या संचालकपदी त्यांची बिनविरोध निवड होणे ही जामखेड तालुक्यासाठी महत्त्वाची बाब मानली जात आहे. सहकार क्षेत्रातील कामकाजाची जाण, अभ्यासपूर्ण दृष्टिकोन आणि विकासाभिमुख विचार यांच्या बळावर ते शेतकरी, विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्था आणि सहकार क्षेत्राशी संबंधित घटकांच्या अपेक्षा पूर्ण करतील, अशी आशा व्यक्त केली जात आहे.

जिल्हा सहकारी बँक ही शेतकरी आणि ग्रामीण अर्थव्यवस्थेसाठी महत्त्वाची संस्था आहे. त्यामुळे या संस्थेच्या संचालकपदाची जबाबदारी सांभाळताना शेतकऱ्यांचे प्रश्न, सहकारी संस्थांसमोरील अडचणी आणि ग्रामीण भागाच्या आर्थिक विकासाशी संबंधित विषयांना प्राधान्य मिळावे, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे. सचिन घुमरे यांच्या निवडीमुळे सहकार क्षेत्रात नव्या विचारांना आणि युवा नेतृत्वाला चालना मिळेल, असा विश्वासही यावेळी व्यक्त करण्यात आला.




