Home ताज्या बातम्या सरदार पटेल जयंतीनिमित्त अहिल्यानगर पोलिसांची ‘एकता दौड’, सायबर गुन्ह्यांविरोधात जनजागृतीचा एल्गार! ...

सरदार पटेल जयंतीनिमित्त अहिल्यानगर पोलिसांची ‘एकता दौड’, सायबर गुन्ह्यांविरोधात जनजागृतीचा एल्गार! ‘डिजिटल एकता, सुरक्षित भविष्य’चा संदेश, पोलीस अधिकारी व अंमलदारांचा उत्स्फूर्त सहभाग

0
3
सरदार पटेल जयंतीनिमित्त अहिल्यानगर पोलिसांची ‘एकता दौड’, सायबर गुन्ह्यांविरोधात जनजागृतीचा एल्गार!     ‘डिजिटल एकता, सुरक्षित भविष्य’चा संदेश, पोलीस अधिकारी व अंमलदारांचा उत्स्फूर्त सहभाग

जामखेड न्युज – – – – 

सरदार पटेल जयंतीनिमित्त अहिल्यानगर पोलिसांची ‘एकता दौड’, सायबर गुन्ह्यांविरोधात जनजागृतीचा एल्गार!

‘डिजिटल एकता, सुरक्षित भविष्य’चा संदेश, पोलीस अधिकारी व अंमलदारांचा उत्स्फूर्त सहभाग

भारताचे लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंतीनिमित्त ३१ ऑक्टोबर रोजी अहिल्यानगर जिल्हा पोलीस दलाच्या वतीने राष्ट्रीय एकता दिवस उत्साहात साजरा करण्यात आला. यानिमित्ताने राष्ट्रीय एकतेची शपथ घेण्यासह महाराष्ट्र सायबर जनजागृती मोहीम २०२६ अंतर्गत ‘एकता दौड’ आयोजित करण्यात आली. या उपक्रमातून राष्ट्रीय एकतेसोबतच सायबर सुरक्षिततेचा संदेश नागरिकांपर्यंत पोहोचविण्यात आला.

पोलीस मुख्यालय, अहिल्यानगर येथे आयोजित कार्यक्रमाची सुरुवात ‘भारत की सुरक्षा, एकता अखंडता को हम सदैव अक्षुण्ण रखेंगे’ या शपथेने झाली. यावेळी पोलीस दलातील अधिकारी व अंमलदारांनी देशाची एकता, अखंडता आणि सुरक्षितता जपण्याचा संकल्प केला.

त्यानंतर ‘डिजिटल एकता, सुरक्षित भविष्य’ हा संदेश देत एकता दौड काढण्यात आली. या मोहिमेद्वारे नागरिकांनी इंटरनेटचा सुरक्षित वापर करावा, सायबर गुन्ह्यांपासून सावध राहावे आणि डिजिटल व्यवहार करताना सतर्कता बाळगावी, असे आवाहन करण्यात आले. ‘सुरक्षित इंटरनेट, सुरक्षित आपण! जागरूक नागरिक, सुरक्षित समाज’ या संदेशाच्या माध्यमातून सायबर सुरक्षेचे महत्त्व अधोरेखित करण्यात आले.

सोशल मीडिया हनीट्रॅपपासून सावध राहण्याचे आवाहन
सोशल मीडियाच्या माध्यमातून होणारी फसवणूक आणि हनीट्रॅपच्या घटनांबाबत जिल्हा पोलिसांनी नागरिकांना सतर्कतेचा इशारा दिला. अनोळखी व्यक्तींकडून येणाऱ्या मैत्रीच्या विनंत्या विचार न करता स्वीकारू नयेत. व्हिडिओ कॉलद्वारे होणाऱ्या गैरप्रकारांना बळी पडू नये. आपली वैयक्तिक माहिती, बँक खात्याचे तपशील तसेच खासगी फोटो व व्हिडिओ कोणासोबतही शेअर करू नयेत, असे आवाहन करण्यात आले. हनीट्रॅप किंवा सायबर फसवणुकीचा संशय आल्यास तातडीने १९३० या सायबर हेल्पलाइन क्रमांकावर संपर्क साधावा किंवा जवळच्या पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवावी, असेही पोलिसांनी स्पष्ट केले.

पोलीस अधीक्षकांच्या मार्गदर्शनाखाली आयोजन
या कार्यक्रमाला अहिल्यानगरचे पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन, अपर पोलीस अधीक्षक वैभव कलुबर्मे, श्रीरामपूरचे अपर पोलीस अधीक्षक सोमनाथ वाघचौरे, शहर विभागाचे उपअधीक्षक दिलीप टिपरसे, पोलीस उपअधीक्षक (गृह) रियाज शेख, राखीव पोलीस निरीक्षक उमेश परदेशी, जिल्हा वाहतूक शाखेचे पोलीस निरीक्षक महेश पाटील आणि सायबर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सागर ढिकले यांची प्रमुख उपस्थिती होती.याशिवाय जिल्ह्यातील विविध विभागांतील पोलीस अधिकारी व अंमलदार मोठ्या संख्येने या उपक्रमात सहभागी झाले.

राष्ट्रीय एकतेसोबत सायबर सुरक्षितताही महत्त्वाची!
राष्ट्रीय एकतेइतकीच आजच्या डिजिटल युगात सायबर सुरक्षितता महत्त्वाची आहे. नागरिकांनी सायबर गुन्ह्यांबाबत जागरूक राहून सुरक्षित इंटरनेटचा वापर करावा, डिजिटल व्यवहार करताना आवश्यक खबरदारी घ्यावी आणि सायबर फसवणुकीपासून स्वतःचे संरक्षण करावे. जागरूक नागरिकांच्या सहभागातूनच डिजिटल भारत आणि सुरक्षित महाराष्ट्र घडविता येईल, असे आवाहन पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन यांनी केले.

पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित करण्यात आलेल्या या उपक्रमातून राष्ट्रीय एकता, सामाजिक बांधिलकी आणि सायबर सुरक्षिततेचा प्रभावी संदेश देण्यात आला.

NO COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

error: Content is protected !!