जामखेड न्युज – – – – –
जामखेडच्या खर्डा रोडवर अपघात! खेमानंद शाळेसमोरील स्पीड ब्रेकरवर दुचाकीस्वार पडला, सामाजिक कार्यकर्ते संजय कोठारी यांची तत्परता!
खेमानंद शाळेसमोरील स्पीड ब्रेकर ठरला अपघाताचे कारण? मातकुळीचे राहुल डोके रस्त्यावर पडले!

जामखेड शहरातील खर्डा रोडवर खेमानंद शाळेसमोर आज, रविवार, दि. ११ ऑक्टोबर रोजी सकाळी सुमारे आठ वाजण्याच्या सुमारास अपघाताची घटना घडली. गावाकडे जात असताना स्पीड ब्रेकरवर दुचाकीचा तोल जाऊन एक व्यक्ती रस्त्यावर पडल्याची माहिती प्रत्यक्षदर्शींनी दिली आहे.

या घटनेत राहुल प्रल्हाद डोके (वय ४२, रा. मातकुळी, ता. आष्टी, जि. बीड) हे अपघातग्रस्त झाल्याची माहिती समोर आली आहे.
आज सकाळी आठ वाजण्याच्या सुमारास सामाजिक कार्यकर्ते संजय कोठारी यांना खेमानंद शाळेजवळ अपघात झाल्याचा फोन आला. माहिती मिळताच त्यांनी तत्काळ रुग्णवाहिका पाठवून मदतीसाठी पुढाकार घेतला. या कामी दीपक भोरे, अशोक बोराटे, तात्यासाहेब जरे यांनी जखमी ला दवाखान्यात हलविण्यासाठी सहकार्य केले.

खेमानंद शाळेसमोरील स्पीड ब्रेकरवर दुचाकीचा तोल जाऊन राहुल डोके हे खाली पडल्याचे घटनास्थळी उपस्थित प्रत्यक्षदर्शींनी सांगितले. अपघातानंतर तातडीने मदत उपलब्ध करून देण्यासाठी संजय कोठारी यांनी दाखवलेली तत्परता महत्त्वाची ठरली.

दरम्यान, या अपघातात राहुल डोके यांना कितपत दुखापत झाली, तसेच त्यांच्यावर कोणत्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत, याबाबतची माहिती उपलब्ध झालेली नाही.




