Home ताज्या बातम्या साकतमध्ये तहसीलदार थेट बांधावर, पिकांची पाहणी करत सरसकट पंचनाम्यांना सुरुवात! शेतकऱ्यांना...

साकतमध्ये तहसीलदार थेट बांधावर, पिकांची पाहणी करत सरसकट पंचनाम्यांना सुरुवात! शेतकऱ्यांना सरसकट अनुदान द्या – डॉ. भगवानराव मुरूमकर

0
4
साकतमध्ये तहसीलदार थेट बांधावर, पिकांची पाहणी करत सरसकट पंचनाम्यांना सुरुवात!  शेतकऱ्यांना सरसकट अनुदान द्या – डॉ. भगवानराव मुरूमकर

जामखेड न्युज – – – – – – 

साकतमध्ये तहसीलदार थेट बांधावर, पिकांची पाहणी करत सरसकट पंचनाम्यांना सुरुवात!

शेतकऱ्यांना सरसकट अनुदान द्या – डॉ. भगवानराव मुरूमकर

जामखेड तालुक्यातील साकत परिसरात पिकांचे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांच्या प्रश्नाची दखल घेत तहसीलदार शितल सावळे यांनी आज थेट बांधावर जाऊन नुकसानग्रस्त पिकांची पाहणी केली. यावेळी प्रशासनाच्या वतीने सरसकट पंचनामे करण्याच्या प्रक्रियेला सुरुवात करण्यात आली.

साकत परिसरात पावसाअभावी तसेच प्रतिकूल हवामानामुळे पिकांवर मोठा परिणाम झाल्याची माहिती शेतकऱ्यांनी प्रशासनाच्या निदर्शनास आणून दिली. या पार्श्वभूमीवर तहसीलदार शितल सावळे यांनी शेतकऱ्यांच्या शेतावर जाऊन प्रत्यक्ष पाहणी केली. नुकसानग्रस्त पिकांची परिस्थिती जाणून घेत पंचनाम्याच्या कार्यवाहीला सुरुवात करण्यात आली.

यावेळी जामखेड पंचायत समितीचे माजी सभापती तथा भाजपा किसान मोर्चाचे प्रदेश उपाध्यक्ष डॉ. भगवानराव मुरूमकर यांनी शेतकऱ्यांच्या नुकसानीचा विचार करून केवळ काही निवडक क्षेत्रापुरते मर्यादित न ठेवता सरसकट शेतकऱ्यांना अनुदानाचा लाभ मिळावा, अशी मागणी तहसीलदार शितल सावळे यांच्याकडे केली.

पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असल्याने प्रत्येक बाधित शेतकऱ्याला शासनाच्या मदतीचा लाभ मिळणे आवश्यक असल्याचे डॉ. मुरूमकर यांनी सांगितले. नुकसानग्रस्त शेतकऱ्यांचे पंचनामे तातडीने पूर्ण करून शासनाकडे अहवाल पाठवावा आणि पात्र शेतकऱ्यांना लवकरात लवकर अनुदान मिळावे, अशी मागणीही यावेळी करण्यात आली.

तहसीलदारांनी प्रत्यक्ष शेतात जाऊन पाहणी केल्याने शेतकऱ्यांमध्ये प्रशासनाकडून मदत मिळण्याची अपेक्षा निर्माण झाली आहे. पंचनाम्याच्या प्रक्रियेनंतर शासनाकडून कोणती मदत जाहीर होते, याकडे साकत परिसरातील शेतकऱ्यांचे लक्ष लागले आहे.

यावेळी मंडलाधिकारी ए. एल. शिरसाट, कृषी अधिकारी समाधान सोनवणे, कामगार तलाठी सलगर, ग्रामसेवक शिंदे, पोलीस पाटील महादेव वराट, ग्रामरोजगार सेवक हरीभाऊ वराट, बाळासाहेब वराट, महादेव वराट यांच्यासह ग्रामस्थ व शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

NO COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

error: Content is protected !!