Thursday, September 24, 2026
Home ताज्या बातम्या गणेशोत्सवात मोदकांचा सुगंध! ल. ना. होशिंग विद्यालयातील विद्यार्थ्यांची सर्जनशील मेजवानी उकडीपासून बिस्किटाच्या...

गणेशोत्सवात मोदकांचा सुगंध! ल. ना. होशिंग विद्यालयातील विद्यार्थ्यांची सर्जनशील मेजवानी उकडीपासून बिस्किटाच्या मोदकांपर्यंत विविध प्रकारांनी रंगली स्पर्धा, रुद्र टेकाळे प्रथम, कार्तिकी पोतदार द्वितीय

0
2
गणेशोत्सवात मोदकांचा सुगंध! ल. ना. होशिंग विद्यालयातील विद्यार्थ्यांची सर्जनशील मेजवानी उकडीपासून बिस्किटाच्या मोदकांपर्यंत विविध प्रकारांनी रंगली स्पर्धा, रुद्र टेकाळे प्रथम, कार्तिकी पोतदार द्वितीय

जामखेड न्युज – – – – – 

गणेशोत्सवात मोदकांचा सुगंध! ल. ना. होशिंग विद्यालयातील विद्यार्थ्यांची सर्जनशील मेजवानी

उकडीपासून बिस्किटाच्या मोदकांपर्यंत विविध प्रकारांनी रंगली स्पर्धा, रुद्र टेकाळे प्रथम, कार्तिकी पोतदार द्वितीय

गणेशोत्सवाच्या उत्साहाला विद्यार्थ्यांच्या सर्जनशीलतेची जोड देत सेवा संकल्प अभियानांतर्गत दि पिपल्स एज्युकेशन सोसायटीच्या ल. ना. होशिंग माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात गणेशोत्सवानिमित्त मोदक स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. या स्पर्धेला विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. सुमारे ५० विद्यार्थ्यांनी विविध प्रकारचे आकर्षक व स्वादिष्ट मोदक तयार करून आपल्या पाककलेचे आणि कल्पकतेचे दर्शन घडविले.

स्पर्धेत विद्यार्थ्यांनी पारंपरिक उकडीचे मोदक, तसेच कडधान्य, बिस्किट, खवा, नारळाच्या सारणाचे मोदक अशा विविध प्रकारांची निर्मिती केली. मोदकांना आकर्षक आकार व सुंदर डिझाईन देत विद्यार्थ्यांनी सादरीकरणातही नावीन्य जपले. त्यामुळे स्पर्धेच्या ठिकाणी गणेशोत्सवाचा उत्साह आणि मोदकांचा सुगंध असा मनमोहक माहोल निर्माण झाला होता.

या मोदक स्पर्धेचे परीक्षण जयश्रीताई उद्धवराव देशमुख, शोभा अनंता खेत्रे आणि वर्षा राजेश मोरे यांनी केले. विद्यार्थ्यांनी तयार केलेल्या मोदकांची चव, आकर्षकता, कल्पकता, सादरीकरण तसेच विविधतेच्या आधारे परीक्षण करण्यात आले.

स्पर्धेतील विजेते
मोदक स्पर्धेत रुद्र टेकाळे याने प्रथम क्रमांक पटकावला. कार्तिकी पोतदार हिने द्वितीय, जुफिया शेख हिने तृतीय, अनुष्का मोरे हिने चौथा, तर स्वरांजली इंगळे हिने पाचवा क्रमांक मिळविला.
यावेळी विद्यालयातील महिला अध्यापिका वंदना अल्हाट, स्वाती बांगर, पूजा भालेराव, प्रियंका सुपेकर, स्वप्नाली घाडगे, प्रमिला आखाडे, शीतल जगदाळे, धुमाळ मॅडम, कारंडे मॅडम, बिनाका धर्मे,मयुरी येरपुडे, भोंडवे मॅडम यांच्यासह अनेक महिला उपस्थित होत्या.

विद्यार्थ्यांच्या कलागुणांना आणि सर्जनशीलतेला व्यासपीठ उपलब्ध करून देणाऱ्या या उपक्रमाचे सर्व स्तरांतून कौतुक होत आहे. अशा उपक्रमांमुळे विद्यार्थ्यांमध्ये स्वावलंबन, सर्जनशीलता, आत्मविश्वास, पाककलेची आवड आणि भारतीय सण-परंपरांविषयीची जाणीव निर्माण होण्यास मदत होते.

स्पर्धेतील यशस्वी विद्यार्थ्यांचे दि पिपल्स एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष उद्धवराव देशमुख, सचिव अरुणशेठ चिंतामणी, उपाध्यक्ष दिलीप गुगळे, सहसचिव डॉ. सुनील कटारिया, माजी सचिव शशिकांत देशमुख, माजी खजिनदार राजेश मोरे, प्राचार्य बी. ए. पारखे, उपप्राचार्य युवराज भोसले, उपमुख्याध्यापक अनिल देडे, पर्यवेक्षक सुदाम वराट, धनवडे भाऊसाहेब, होशिंग भाऊसाहेब, साईराज भोसले तसेच सर्व शिक्षक-शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी अभिनंदन केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

error: Content is protected !!