Home ताज्या बातम्या जामखेडमध्ये टेक्नॉलॉजीचा नवा धमाका! आष्टेकर मोबाईलमध्ये iPhone 18 Pro Seriesचे दिमाखदार लॉन्चिंग

जामखेडमध्ये टेक्नॉलॉजीचा नवा धमाका! आष्टेकर मोबाईलमध्ये iPhone 18 Pro Seriesचे दिमाखदार लॉन्चिंग

0
5
जामखेडमध्ये टेक्नॉलॉजीचा नवा धमाका! आष्टेकर मोबाईलमध्ये iPhone 18 Pro Seriesचे दिमाखदार लॉन्चिंग

जामखेड न्युज – – – – – – 

जामखेडमध्ये टेक्नॉलॉजीचा नवा धमाका! आष्टेकर मोबाईलमध्ये iPhone 18 Pro Seriesचे दिमाखदार लॉन्चिंग

आजचा दिवस जामखेड शहरासाठी खास आणि टेक्नॉलॉजीप्रेमींसाठी अविस्मरणीय ठरला. शहरातील आष्टेकर मोबाईल येथे बहुप्रतिक्षित iPhone 18 Pro Seriesचे दिमाखदार लॉन्चिंग उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाले.

जामखेड शहराच्या नगराध्यक्षा सौ. प्रांजलताई अमित चिंतामणी आणि मार्गदर्शक प्रा. श्री. मधुकर (आबा) राळेभात यांच्या शुभहस्ते या नव्या टेक्नॉलॉजीचे शानदार अनावरण करण्यात आले. यावेळी उपस्थित मान्यवरांनी आष्टेकर मोबाईल परिवाराला शुभेच्छा देत या नव्या उपक्रमाचे कौतुक केले.

या भव्य लॉन्चिंग सोहळ्यास उपनगराध्यक्ष श्री. पोपटनाना राळेभात, जिल्हा बँकेचे संचालक अमोल राळेभात, नगरसेवक श्री. मनोज काका कुलकर्णी, मा. नगरसेवक अमित चिंतामणी, नगरसेवक पवन राजे राळेभात, नगरसेवक संजय काका काशीद, शहाजी (काका) राळेभात, बापुसाहेब कार्ले, नगरसेवक श्रीराम डोके, नगरसेवक प्रा. विकी सर घायतडक, नगरसेवक मोहन वस्ताद पवार, नगरसेवक संतोष भाऊ गव्हाळे, नगरसेवक महेश निमोणकर, नगरसेवक गणेश डोंगरे, नगरसेवक प्रवीण होळकर, नगरसेवक अर्जुन म्हेत्रे, नगरसेवक प्रशांत काका राळेभात यांच्यासह शहरातील विविध क्षेत्रांतील मान्यवरांची उपस्थिती लाभली.

यावेळी सागर टकले, प्रवीण शेठ चोरडिया, इस्माईल भाई सय्यद, मुक्तार सय्यद, हर्षद काळे, प्रा. कैलास माने सर, प्रदीप टापरे, प्रदीप बोलभट, ज्ञानेश्वर अंदुरे, विकास मासाळ, सुरज दादा पवार, उद्योजक आकाश शेठ बाफना, निखिल बोथरा, निलेश पारख, अर्थराज गायकवाड, सागर रिठे, महेश शिंदे, सुरज साखरे, सिद्धार्थ सदाफुले, कालिदास गिरी, विनायक घोरपडे, रजत आजबे, विकी बांदल, राहुल फाळके, अनिकेत आंदुरे, दीपक काळे आदी उपस्थित होते.
लॉन्चिंगच्या निमित्ताने आष्टेकर मोबाईल येथे ग्राहक आणि टेक्नॉलॉजीप्रेमींमध्ये मोठा उत्साह पाहायला मिळाला.

अत्याधुनिक तंत्रज्ञान, आकर्षक डिझाईन आणि नव्या फीचर्समुळे iPhone 18 Pro Seriesने उपस्थितांचे लक्ष वेधून घेतले.

“नवीन टेक्नॉलॉजी… नवा अंदाज… आणि विश्वास मात्र तोच – आष्टेकर मोबाईल!” या विश्वासाला आणखी एक नवी झळाळी देणारा हा सोहळा ठरला.
या ऐतिहासिक क्षणी उपस्थित राहून आष्टेकर मोबाईल परिवाराचा उत्साह वाढविणाऱ्या सर्व मान्यवर, ग्राहक, मित्रपरिवार आणि हितचिंतकांचे यावेळी मनःपूर्वक आभार व्यक्त करण्यात आले.

जामखेडच्या मोबाईल आणि टेक्नॉलॉजी क्षेत्रात ग्राहकांचा विश्वास कायम राखत अत्याधुनिक मोबाईल तंत्रज्ञान उपलब्ध करून देण्याचा आष्टेकर मोबाईलचा प्रवास या निमित्ताने आणखी एका नव्या टप्प्यावर पोहोचला आहे.

NO COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

error: Content is protected !!