Friday, September 18, 2026
Home ताज्या बातम्या आभाळाकडे डोळे, गणरायाकडे साकडे! जामखेडमध्ये पावसासाठी आकाश बाफना यांची गणरायाला भावनिक...

आभाळाकडे डोळे, गणरायाकडे साकडे! जामखेडमध्ये पावसासाठी आकाश बाफना यांची गणरायाला भावनिक प्रार्थना, शेतकरी, पशुधन अन् पाणीप्रश्नाकडे वेधले लक्ष

0
2
आभाळाकडे डोळे, गणरायाकडे साकडे!  जामखेडमध्ये पावसासाठी आकाश बाफना यांची गणरायाला भावनिक प्रार्थना, शेतकरी, पशुधन अन् पाणीप्रश्नाकडे वेधले लक्ष

जामखेड न्युज – – – – – – 

आभाळाकडे डोळे, गणरायाकडे साकडे!

जामखेडमध्ये पावसासाठी आकाश बाफना यांची गणरायाला भावनिक प्रार्थना, शेतकरी, पशुधन अन् पाणीप्रश्नाकडे वेधले लक्ष

जामखेड तालुक्यात पावसाने पाठ फिरवल्याने शेती, पिण्याचे पाणी आणि पशुधनाचा प्रश्न दिवसेंदिवस गंभीर होत चालला आहे. पावसाच्या प्रतीक्षेत शेतकऱ्यांच्या नजरा आकाशाकडे लागल्या असून खरीप पिकांवरही पावसाअभावी संकट निर्माण झाले आहे. अशा चिंताजनक परिस्थितीत शिवसेना युवा नेते आकाश बाफना यांनी गणेशोत्सवानिमित्त गणरायाच्या चरणी पावसासाठी साकडे घातले. 

तालुक्यात समाधानकारक पाऊस पडावा, कोरड्या पडलेल्या शिवारांना पाण्याची ओल मिळावी, शेतकऱ्यांच्या पिकांना जीवदान मिळावे, नागरिकांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सुटावा आणि पशुधनासाठी मुबलक पाणी उपलब्ध व्हावे, अशी मनोभावे प्रार्थना बाफना यांनी गणरायाकडे केली.

जामखेड तालुक्यात पावसाची प्रतीक्षा लांबत चालली असून ग्रामीण भागातील शेतकरी आणि पशुपालकांमध्ये चिंतेचे वातावरण आहे. पावसाअभावी पिकांची वाढ खुंटण्याची तसेच पाणीटंचाई अधिक तीव्र होण्याची भीती व्यक्त होत आहे. त्यामुळे यंदाचा गणेशोत्सव साजरा करताना अनेकांच्या मनात उत्साहासोबतच पावसाची आसही कायम आहे.

याच पार्श्वभूमीवर आकाश बाफना यांनी गणरायाच्या चरणी केलेली प्रार्थना ही केवळ धार्मिक भावना नसून तालुक्यातील शेतकरी, कष्टकरी आणि सामान्य नागरिकांच्या पावसासाठी सुरू असलेल्या प्रतीक्षेचे प्रतिबिंब ठरली आहे.
“गणराया, जामखेडच्या धरतीवर भरभरून पाऊस पडू दे; शेतकरी, नागरिक आणि पशुधनाला दिलासा दे,” अशी भावना यावेळी व्यक्त करण्यात आली.

पावसाच्या प्रतीक्षेत असलेल्या जामखेड तालुक्यात गणरायाकडे करण्यात आलेले हे साकडे सध्या नागरिकांमध्ये चर्चेचा विषय ठरत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

error: Content is protected !!