Tuesday, September 15, 2026
Home ताज्या बातम्या जामखेडमध्ये मानाच्या पाच गणेश मंडळांत गणरायाची थाटात प्रतिष्ठापना! नगराध्यक्षा प्रांजलताई...

जामखेडमध्ये मानाच्या पाच गणेश मंडळांत गणरायाची थाटात प्रतिष्ठापना! नगराध्यक्षा प्रांजलताई चिंतामणी यांच्या शुभहस्ते विधिवत पूजा, वरुणराजाच्या आगमनासाठी गणरायाच्या चरणी प्रार्थना

0
2
जामखेडमध्ये मानाच्या पाच गणेश मंडळांत गणरायाची थाटात प्रतिष्ठापना!   नगराध्यक्षा प्रांजलताई चिंतामणी यांच्या शुभहस्ते विधिवत पूजा, वरुणराजाच्या आगमनासाठी गणरायाच्या चरणी प्रार्थना

जामखेड न्युज – – – – – 

जामखेडमध्ये मानाच्या पाच गणेश मंडळांत गणरायाची थाटात प्रतिष्ठापना!

नगराध्यक्षा प्रांजलताई चिंतामणी यांच्या शुभहस्ते विधिवत पूजा, वरुणराजाच्या आगमनासाठी गणरायाच्या चरणी प्रार्थना

जामखेड शहरातील गणेशोत्सवाला मोठ्या उत्साहात आणि भक्तिमय वातावरणात सुरुवात झाली. जामखेड नगरपरिषदेसह शहरातील मानाच्या पाच गणेश मंडळांच्या गणेशमूर्तींची प्रतिष्ठापना प्रथम लोकनियुक्त नगराध्यक्षा सौ. प्रांजलताई अमित चिंतामणी यांच्या शुभहस्ते विधिवत पूजा-अर्चा करून संपन्न झाली.

यावेळी संघर्ष मित्र मंडळ, शिवशांती तरुण मंडळ, युवाशक्ती प्रतिष्ठाण, विश्वक्रांती मित्र मंडळ आणि श्री शिवसूर्य प्रतिष्ठाण या मानाच्या गणेश मंडळांच्या गणरायाची भक्तिभावाने प्रतिष्ठापना करण्यात आली.

गणेशमूर्ती प्रतिष्ठापनेच्या वेळी मंडळांच्या कार्यकर्त्यांसह मोठ्या संख्येने गणेशभक्त उपस्थित होते. ढोल-ताशांचा गजर, गणपती बाप्पा मोरयाच्या जयघोषाने परिसर भक्तिमय झाला होता. पारंपरिक पद्धतीने पूजा-अर्चा करून गणरायाचे स्वागत करण्यात आले.

यंदा जामखेड तालुक्यात पावसाची मोठी प्रतीक्षा असून खरीप पिकांसह पिण्याच्या पाण्याचा प्रश्नही गंभीर बनला आहे. त्यामुळे वरुणराजाचे आगमन होऊन शेतकरी व नागरिकांना दिलासा मिळावा, तालुक्यात समाधानकारक पाऊस पडावा, अशी प्रार्थना गणरायाच्या चरणी करण्यात आली.

गणेशोत्सवाच्या निमित्ताने शहरातील वातावरण आनंदी, भक्तिमय आणि उत्साहपूर्ण झाले आहे. यावेळी नगराध्यक्षा प्रांजलताई चिंतामणी यांनी गणेशभक्तांना गणेशोत्सवाच्या शुभेच्छा देत, गणेशोत्सव शांततेत, उत्साहात आणि सामाजिक सलोखा जपत साजरा करण्याचे आवाहन केले.

“गणपती बाप्पा मोरया… मंगलमूर्ती मोरया!” या जयघोषात गणरायाचे जामखेड शहरात जल्लोषात स्वागत करण्यात आले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

error: Content is protected !!