Saturday, September 12, 2026
Home ताज्या बातम्या जिद्द, मेहनत अन् MPSC पूर्वतयारीला यशाची जोड, नायगावच्या अशोक शिंदे यांची महसूल...

जिद्द, मेहनत अन् MPSC पूर्वतयारीला यशाची जोड, नायगावच्या अशोक शिंदे यांची महसूल सहाय्यकपदी निवड!

0
2
जिद्द, मेहनत अन् MPSC पूर्वतयारीला यशाची जोड, नायगावच्या अशोक शिंदे यांची महसूल सहाय्यकपदी निवड!

जामखेड न्युज – – – – – 

जिद्द, मेहनत अन् MPSC पूर्वतयारीला यशाची जोड, नायगावच्या अशोक शिंदे यांची महसूल सहाय्यकपदी निवड!

ग्रामीण भागातील प्रतिकूल परिस्थितीवर मात करत सातत्यपूर्ण मेहनत, जिद्द आणि ध्येयावर लक्ष केंद्रित केल्यास यश निश्चित मिळते, याचा प्रत्यय नायगाव येथील अशोक शिंदे यांच्या यशातून आला आहे. अशोक शिंदे यांची महसूल सहाय्यक पदावर निवड झाली असून, त्यांच्या या यशाबद्दल नायगाव, जामखेड तसेच पुणे परिसरातून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

अशोक शिंदे यांनी आपल्या प्राथमिक शिक्षणाची सुरुवात जि.प. प्राथमिक शाळा, नायगाव, ता. जामखेड येथून केली. त्यानंतर पंचक्रोशी विद्यालय, नायगाव येथे त्यांनी माध्यमिक शिक्षण पूर्ण केले. उच्च माध्यमिक शिक्षणासाठी त्यांनी श्री म्हाळसाकांत कनिष्ठ महाविद्यालय, आकुर्डी (पुणे) येथे प्रवेश घेतला. पुढे प्रेमराज सारडा महाविद्यालय, अहिल्यानगर येथून त्यांनी महाविद्यालयीन शिक्षण पूर्ण केले.

शिक्षणाच्या विविध टप्प्यांवर आपली गुणवत्ता सिद्ध करत असतानाच त्यांनी स्पर्धा परीक्षेची तयारी सुरू ठेवली. MPSC पूर्व परीक्षेची तयारी करताना सातत्य, अभ्यासातील शिस्त आणि ध्येय निश्चित ठेवून त्यांनी केलेल्या प्रयत्नांना अखेर यशाची किनार मिळाली.

ग्रामीण भागातून शिक्षण घेत शासकीय सेवेत प्रवेश मिळविण्याचे स्वप्न पूर्ण करणारे अशोक शिंदे यांचे यश हे नायगाव परिसरातील विद्यार्थ्यांसाठी निश्चितच प्रेरणादायी ठरणारे आहे. परिस्थिती कोणतीही असो, योग्य नियोजन, सातत्यपूर्ण अभ्यास आणि कठोर परिश्रमाच्या जोरावर स्पर्धा परीक्षेत यश मिळवता येते, हे त्यांनी आपल्या कृतीतून दाखवून दिले आहे.

अशोक शिंदे यांच्या महसूल सहाय्यकपदी झालेल्या निवडीबद्दल कुटुंबीय, शिक्षक, मित्रपरिवार, नायगाव ग्रामस्थ तसेच जामखेड आणि पुणे परिसरातील विविध मान्यवरांकडून त्यांचे अभिनंदन करण्यात येत आहे. त्यांच्या पुढील शासकीय सेवेसाठीही शुभेच्छा व्यक्त होत आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

error: Content is protected !!