Tuesday, September 8, 2026
Home ताज्या बातम्या भुतवडा’चा जलसाठा आटला! महिनाभराचेच पाणी शिल्लक भाजप शहर मंडलची तलावाची पाहणी,...

भुतवडा’चा जलसाठा आटला! महिनाभराचेच पाणी शिल्लक भाजप शहर मंडलची तलावाची पाहणी, ‘पाणी जपून वापरा, अपव्यय टाळा’ – संजय काशिद

0
2
भुतवडा’चा जलसाठा आटला! महिनाभराचेच पाणी शिल्लक  भाजप शहर मंडलची तलावाची पाहणी, ‘पाणी जपून वापरा, अपव्यय टाळा’ – संजय काशिद

जामखेड न्युज – – – – 

भुतवडा’चा जलसाठा आटला! महिनाभराचेच पाणी शिल्लक

भाजप शहर मंडलची तलावाची पाहणी, ‘पाणी जपून वापरा, अपव्यय टाळा’ – संजय काशिद

जामखेड शहराच्या पाणीपुरवठ्याच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वपूर्ण असलेल्या भुतवडा तलावातील पाणीसाठा दिवसेंदिवस कमी होत असून, उपलब्ध पाणी आगामी काळासाठी जपून वापरण्याची गरज निर्माण झाली आहे. सध्याचा पाणीसाठा साधारण महिनाभर पुरेल, अशी परिस्थिती पाहणीदरम्यान निदर्शनास आली. त्यामुळे नागरिकांनी पाण्याचे महत्त्व ओळखून पिण्याच्या पाण्याचा काटकसरीने वापर करावा आणि पाण्याचा अपव्यय टाळावा, असे आवाहन भाजप शहर मंडल अध्यक्ष तथा नगरसेवक संजय (काका) काशिद यांनी केले.

भाजप शहर मंडलच्या वतीने ज्येष्ठ नेते प्रा. मधुकर (आबा) राळेभात यांच्या मार्गदर्शनाखाली भुतवडा तलावाची पाहणी करण्यात आली. यावेळी तलावातील उपलब्ध पाणीसाठा, मृतसाठा तसेच तलाव परिसराची सद्यःस्थिती याचा प्रत्यक्ष आढावा घेण्यात आला.

पाहणीदरम्यान तलावात उपलब्ध असलेला पाणीसाठा आगामी काळात शहराची पाण्याची गरज भागविण्यासाठी अत्यंत महत्त्वाचा असल्याचे स्पष्ट झाले. उपलब्ध पाण्याचा काटेकोर वापर केल्यास पाणीपुरवठा व्यवस्थापन करणे शक्य होणार असून, नागरिकांनीही प्रशासनाला सहकार्य करणे आवश्यक असल्याचे उपस्थितांनी सांगितले.

तलाव परिसर स्वच्छ करण्याच्या सूचना
तलावाच्या आसपास मोठ्या प्रमाणात झाडे-झुडपे वाढल्याचेही पाहणीदरम्यान निदर्शनास आले. त्यामुळे तलाव परिसरातील वाढलेली झाडे-झुडपे हटवून परिसराची तातडीने साफसफाई व स्वच्छता करण्याच्या सूचना संबंधित कर्मचाऱ्यांना देण्यात आल्या. तलाव परिसराची नियमित स्वच्छता व देखभाल करण्याची गरजही यावेळी व्यक्त करण्यात आली.

शेतकऱ्यांशी पाणी नियोजनाबाबत चर्चा
पाहणीवेळी उपस्थित शेतकरी बांधवांशीही चर्चा करण्यात आली. तलावातील उपलब्ध पाणीसाठा, मृतसाठा, पाण्याचा वापर आणि आगामी काळातील पाणी नियोजन याबाबत शेतकऱ्यांशी हितगुज करण्यात आले. शहराचा पाणीपुरवठा आणि उपलब्ध पाण्याचे नियोजन याबाबत स्थानिक पातळीवर आवश्यक उपाययोजना करण्यावर भर देण्यात आला.

नगर परिषद प्रशासनाशी समन्वय साधणार
उपलब्ध पाणीसाठ्याचे योग्य नियोजन करून शहरवासीयांना पाणीपुरवठा सुरळीत ठेवण्यासाठी आवश्यक त्या उपाययोजना करण्यात याव्यात, यासाठी नगर परिषद प्रशासनाशी समन्वय साधण्यात येईल, असे संजय काशिद यांनी सांगितले.

सध्याची परिस्थिती लक्षात घेता नागरिकांनी पाण्याचा प्रत्येक थेंब जपून वापरणे गरजेचे आहे. पिण्याच्या पाण्याचा अनावश्यक वापर टाळावा, नळ सुरू ठेवू नये आणि उपलब्ध पाण्याचा काटकसरीने वापर करावा, असे आवाहनही त्यांनी केले.

यावेळी
जामखेड नगर परिषदेचे भाजपा गटनेते तात्याराम पोकळे, पाणीपुरवठा विभागाचे सभापती श्रीराम डोके, बांधकाम समितीचे सभापती मोहन पवार, नगरसेवक पवन राळेभात, माजी नगरसेवक अमित चिंतामणी, अर्जुन म्हेत्रे, पाणीपुरवठा अधिकारी ज्ञानेश्वर मिसाळ यांच्यासह नगर परिषद कर्मचारी आणि शेतकरी बांधव उपस्थित होते.

‘भुतवडा’चा जलसाठा आटला! महिनाभराचेच पाणी शिल्लक; जामखेडकरांना काटकसरीचा इशारा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

error: Content is protected !!