जामखेड न्युज – – – – – –
प्राचार्य बाळासाहेब पारखे यांच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा, २०२६ चा राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार
जैन कॉन्फरन्स आणि कोठारी प्रतिष्ठान तर्फे पुरस्कार जाहीर

प्राचार्य बाळासाहेब आप्पा पारखे ल ना होशिंग माध्य व उच्च माध्यमिक विद्यालय जामखेड जि. अहिल्यानगर यांना जैन कॉन्फरन्स चतुर्थ झोन दिल्ली आणि कै. सुवालाल भगवानदास कोठारी सामाजिक प्रतिष्ठान जामखेड यांचेकडून २०२६ चा राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार शिक्षक दि. ५ सप्टेंबर २०२६ रोजी त्यांच्या उल्लेखनीय व महान कार्याची दखल घेऊन शनिवार दिनांक ५ सप्टेंबर शिक्षक दिनानिमित्ताने जामखेड येथील ल ना होशिंग माध्य व उच्च माध्यमिक विद्यालयातील भारतरत्न डॉ ए पी जे अब्दुल कलाम सभागृह येथे प्रदान करण्यात येणार आहे. पुरस्कार जाहीर होताच दि पिपल्स एज्युकेशन सोसायटीच्या सर्व संचालक मंडळासह सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी प्राचार्य पारखे यांचे अभिनंदन केले आहे.

पिंपळगाव आळवा जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थी ते ल.ना. होशिंग विद्यालयाच्या प्राचार्य पदापर्यंतचा त्यांचा खडतर प्रवास इतरांसाठी प्रेरणादायी व यशस्वी वाटचालीचे उत्तम उदाहरण आहे. शैक्षणिक , साहित्य, कला, क्रीडा व विज्ञान क्षेत्रातील आपलं योगदान अभूतपूर्व आहे. विद्यार्थ्यांच्या सुप्त गुणांना वाव देण्यासाठी आपण योग्य साधनेच्या मदतीने प्रेरणादायी उपक्रम राबवत आहात. म्हणूनच आपली ओळख समाजप्रिय हाडांचे शिक्षक म्हणून सर्व दूर पोहोचली आहे.

आपल्या कार्याचा गौरव म्हणून आपण अनेक पुरस्काराचे मानकरी आहात
भारत वर्षाची महान प्राचीन योग विद्या आपणास अवगत आहे. त्याचीच दखल घेऊन आपली राज्यस्तरीय पंच म्हणून निवड झालेली आहे.ही निवड जामखेड तालुक्याचं नाव उंचवणारी अभिमानास्पद व उल्लेखनीय आहे शिक्षणाबरोबरच योग विद्येच्या मोफत व निस्वार्थ प्रशिक्षणातून समाजाच्या निरोगी आरोग्यासाठी आपण घेत असलेल्या मोफत योग वर्ग ही राष्ट्राची महान सेवा आहे. याचा आम्हास सार्थ अभिमान आहे.

या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जामखेड येथील प्रसिद्ध उद्योगपती कांतीलाल कोठारी हे राहणार असून प्रमुख अतिथी म्हणून दि पिपल्स एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष उद्धवराव देशमुख, शितल सावळे तहसीलदार जामखेड, तसेच
प्रमुख पाहुणे म्हणून दि. पिपल्स एज्युकेशन सोसायटीचे सचिव अरुणशेठ चिंतामणी, जामखेड नगर परिषदेच्या लोक नियुक्त नगराध्यक्षा सौ. प्रांजल अमित चिंतामणी, गटविकास अधिकारी शुभम जाधव, जामखेड पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक दशरथ चौधरी ,
गटशिक्षणाधिकारी धनंजय बोंदार्डे
डॉ. मनोज शिंदे वैद्यकीय अधिक्षक, डॉ. संजय भोरे सनराईज मेडिकल अँड एज्युकेशन संस्था संचालक,समर्थ हॉस्पिटलचे संचालक डॉ.भरत दारकुंडे, शिवनेरी अकॅडमी चे संचालक
कॅप्टन लक्ष्मण भोरे , सकाळचे पत्रकार
संतराम सूळ, लोकमतचे पत्रकार
अशोक निमोणक उपस्थित राहणार आहेत.


