Wednesday, August 26, 2026
Home ताज्या बातम्या नगराध्यक्षा प्रांजल चिंतामणी आयोजित कावड यात्रा भक्तीमय वातावरणात संपन्न, नागेश्वर चरणी पावसासाठी...

नगराध्यक्षा प्रांजल चिंतामणी आयोजित कावड यात्रा भक्तीमय वातावरणात संपन्न, नागेश्वर चरणी पावसासाठी साकडे, महिलांचा उत्स्फूर्त सहभाग

0
2
नगराध्यक्षा प्रांजल चिंतामणी आयोजित कावड यात्रा भक्तीमय वातावरणात संपन्न, नागेश्वर चरणी पावसासाठी साकडे, महिलांचा उत्स्फूर्त सहभाग

जामखेड न्युज – – – – – 

नगराध्यक्षा प्रांजल चिंतामणी आयोजित कावड यात्रा भक्तीमय वातावरणात संपन्न, नागेश्वर चरणी पावसासाठी साकडे, महिलांचा उत्स्फूर्त सहभाग

जामखेड नगराध्यक्षा प्रांजल चिंतामणी यांच्या आयोजनातून शनी मंदिर ते नागेश्वर मंदिर अशी कावड यात्रा उत्साहात पार पडली. या कावड यात्रेला महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.
महिलांनी सजविलेल्या कावडी घेऊन भक्तिभावाने कावड यात्रा काढली.

शहरात धार्मिक उत्साहाचे वातावरण पाहायला मिळाले. मोठ्या संख्येने महिला पारंपरिक वेशभूषेत सहभागी होत भक्तिमय वातावरणात मिरवणुकीत सहभागी झाल्या होत्या पिवळ्या, भगव्या आणि विविध रंगांच्या साड्यांमध्ये सजलेल्या महिलांनी फुलांनी सजविलेल्या धार्मिक साहित्यासह मिरवणुकीत सहभाग घेतला.

यात्रेत शहरातील शेकडो महिलांनी उत्स्फूर्त सहभाग घेतला होता. हर हर महादेवाच्या जयघोषात ही यात्रा शहरातील प्रमुख मार्गावरून काढण्यात आली. तालुक्यात पावसाने दडी मारल्याने यंदा दुष्काळाचे सावट आहे. या पार्श्वभूमीवर या कावड यात्रेच्या माध्यमातून नागेश्वर मंदिरात पावसासाठी साकडे घालण्यात आले. चांगला पाऊस पडून शेतकऱ्यांचे संकट दूर होऊ दे, अशी प्रार्थना यावेळी करण्यात आली.

यात्रेचे ठिकठिकाणी स्वागत करण्यात आले असून या यशस्वी आयोजनाबद्दल नगराध्यक्षा प्रांजल चिंतामणी यांचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे. नागेश्वर मंदिरात पोहोचल्यानंतर कावडीतील पवित्र जल नागेश्वराच्या पिंडीवर अर्पण करून पूजा-अर्चा व आरती करण्यात आली. यावेळी परिसरात भक्तीमय आणि धार्मिक वातावरण निर्माण झाले होते.

पत्रकारांशी बोलताना नगराध्यक्षा प्रांजल चिंतामणी म्हणाल्या, “जामखेड तालुक्यात पावसाची प्रतीक्षा आहे. नागेश्वर महाराजांकडे चांगल्या पावसासाठी साकडे घातले असून, तालुक्यातील शेतकरी व नागरिकांच्या सुख-समृद्धीसाठी प्रार्थना केली.”

कावड यात्रेनंतर भाविकांना प्रसादाचे वाटप करण्यात आले. महिलांसह नागरिकांनी मोठ्या श्रद्धेने या धार्मिक उपक्रमात सहभाग घेतला.

पवित्र कावड यात्रेत प्रांजल चिंतामणी, नगरसेविका नंदाताई होळकर, नागेश्वर भजनी मंडळाचे अध्यक्ष बाबासाहेब खराडे, मिलिंद ब्रम्हे, संतोष बारगजे, धर्माधिकारी, मेजर काळे महाराज, राळेभात महाराज, अमित चिंतामणी, पवन राळेभात यांच्यासह भाविक भक्त, महिला भगिनी व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. या भक्तिमय सोहळ्यामुळे भौम प्रदोषनिमित्त जामखेड शहरात धार्मिक वातावरण निर्माण झाले होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

error: Content is protected !!