Home ताज्या बातम्या कर्जत-जामखेडच्या ताकदीने ३८ लाख शेतकऱ्यांना कर्जमाफी, कांद्याला योग्य भाव : रोहित पवार...

कर्जत-जामखेडच्या ताकदीने ३८ लाख शेतकऱ्यांना कर्जमाफी, कांद्याला योग्य भाव : रोहित पवार जामखेडमध्ये शेतकऱ्यांकडून आमदार रोहित पवारांचा भव्य सत्कार; हजारो कार्यकर्ते व शेतकऱ्यांची उपस्थिती

0
8
कर्जत-जामखेडच्या ताकदीने ३८ लाख शेतकऱ्यांना कर्जमाफी, कांद्याला योग्य भाव : रोहित पवार  जामखेडमध्ये शेतकऱ्यांकडून आमदार रोहित पवारांचा भव्य सत्कार; हजारो कार्यकर्ते व शेतकऱ्यांची उपस्थिती

जामखेड न्युज – – —

कर्जत-जामखेडच्या ताकदीने ३८ लाख शेतकऱ्यांना कर्जमाफी, कांद्याला योग्य भाव : रोहित पवार

जामखेडमध्ये शेतकऱ्यांकडून आमदार रोहित पवारांचा भव्य सत्कार; हजारो कार्यकर्ते व शेतकऱ्यांची उपस्थिती

कर्जत-जामखेडकरांनी माझ्या पाठीशी उभी केलेल्या ताकतीच्या जोरावरच राज्यातील शेतकरी आणि विद्यार्थ्यांच्या हक्कासाठी संघर्ष करता आला. अन्नत्याग उपोषण व विविध आंदोलनांमुळे राज्यातील ३८ लाख शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळाली, तसेच कांद्याच्या भावासाठी केलेल्या आंदोलनामुळे कांद्याला ५ रुपयांवरून ३८ रुपयांपर्यंत भाव मिळवून देता आला, असे प्रतिपादन राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी केले.

जामखेड तालुक्यातील शेतकरी आणि महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांच्या वतीने आमदार रोहित पवार यांच्या सत्काराचा भव्य सोहळा आयोजित करण्यात आला होता. यावेळी उपस्थितांना संबोधित करताना ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष दादाभाऊ कळमकर होते.

आमदार रोहित पवार म्हणाले, “विरोधकांनी माझ्या उपोषणावर आणि आंदोलनांवर टीका केली. मात्र, मी त्याकडे दुर्लक्ष केले. विद्यार्थी आणि शेतकऱ्यांना न्याय मिळवून देण्यासाठी माझा हा संघर्ष यापुढेही सुरूच राहील.”

 

पंढरपूरच्या विठ्ठलाच्या साक्षीने केले अन्नत्याग आंदोलन
राज्य सरकारने यापूर्वी फसवी कर्जमाफी दिली होती. त्याचा अभ्यास करून आपण सरकारकडे सरसकट कर्जमाफीची मागणी केली; मात्र सरकारने त्याकडे दुर्लक्ष केले. त्यामुळे पंढरपूरच्या विठ्ठलाच्या साक्षीने अन्नत्याग आंदोलन केले. या आंदोलनाची दखल घेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत सरसकट कर्जमाफीची घोषणा केली. त्याचा राज्यातील ३८ लाख शेतकऱ्यांना थेट फायदा झाला, असा दावा रोहित पवार यांनी केला.
कांद्याच्या भावासाठी नाशिक, चांदवडमध्ये आंदोलन
कांद्याला अवघा पाच रुपये भाव मिळत असताना शेतकऱ्यांच्या प्रश्नासाठी नाशिक आणि चांदवड येथे रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. या आंदोलनानंतर कांद्याच्या भावात वाढ झाली असून आज कांद्याला ३८ रुपयांपर्यंत भाव मिळत आहे, असेही त्यांनी सांगितले.

“कर्जत-जामखेडच्या जनतेने माझ्या पाठीशी ठामपणे उभे राहून मला ताकद दिली. याच ताकदीच्या जोरावर शेतकरी आणि विद्यार्थ्यांच्या प्रश्नांसाठी पुढील काळातही लढत राहणार आहे. पुढील निवडणुकीतही याच पाठिंब्याच्या बळावर तिसऱ्यांदा निवडून येईन,” असा विश्वास आमदार रोहित पवार यांनी व्यक्त केला.

बैलगाडीतून मिरवणूक; जेसीबीने भव्य हार

कार्यक्रमाच्या सुरुवातीला मंगेश आजबे यांच्या दुकानापासून नगर रोडवरील ‘साई मंगल कार्यालय’पर्यंत आमदार रोहित पवार यांची बैलगाडीतून भव्य मिरवणूक काढण्यात आली. यावेळी कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी केली. “एकच वादा, रोहित दादा” तसेच “रोहित दादा तुम आगे बढो, हम तुम्हारे साथ है” अशा घोषणांनी परिसर दुमदुमून गेला.

रस्त्यात ठिकठिकाणी जेसीबीच्या साह्याने आमदार रोहित पवार यांना भव्य हार घालून स्वागत करण्यात आले. तसेच फटाक्यांची आतषबाजी करण्यात आल्याने कार्यक्रमाला उत्साहाचे वातावरण निर्माण झाले.

कार्यक्रमानंतर उपस्थित शेतकरी आणि कार्यकर्त्यांसाठी शंभूराजे संकुलचे मंगेश दादा आजबे यांच्या वतीने भोजनाची व्यवस्था करण्यात आली होती. या सोहळ्याला तालुक्यातील हजारो शेतकरी, पदाधिकारी तसेच महाविकास आघाडीचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

चौकट

जेसीबीने भव्य हाराची हॅटट्रिक

आमदार रोहित पवार २०१९ ला भरघोस मताधिक्यांनी निवडणूक आल्यावर कर्जत जामखेड मधील कार्यकर्त्यांनी जेसीबीच्या साह्याने हार घातला होता २०२४ मधील अतितटीच्या निवडणुकीतही विजय मिळविला यावेळीही जेसीबीच्या साह्याने हार घातला होता आता कर्जमाफी व कांदा भाववाढ मिळाल्याने शेतकऱ्यांनी आमदार रोहित पवार यांना जेसीबीच्या साह्याने भव्य हार घातला यामुळे जेसीबीच्या हाराची हॅटट्रिक झाली आहे.

NO COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

error: Content is protected !!