Home ताज्या बातम्या ल. ना. होशिंग विद्यालयात राज्यस्तरीय बाल चित्रकला स्पर्धा उत्साहात संपन्न

ल. ना. होशिंग विद्यालयात राज्यस्तरीय बाल चित्रकला स्पर्धा उत्साहात संपन्न

0
9

जामखेड न्युज – – – – – 

ल. ना. होशिंग विद्यालयात राज्यस्तरीय बाल चित्रकला स्पर्धा उत्साहात संपन्न

कला संचालनालय, महाराष्ट्र राज्य यांच्या आयोजनानुसार राज्यस्तरीय बाल चित्रकला स्पर्धेचे आयोजन ल. ना. होशिंग माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात उत्साहपूर्ण वातावरणात करण्यात आले. संपूर्ण तालुक्यात सुमारे ९०० विद्यार्थी या स्पर्धेत सहभागी झाले आहेत. प्रत्येक विद्यालयात परीक्षेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेमुळे विद्यार्थ्यांनी आपल्या कल्पनाशक्तीला रंगांची जोड देत विविध विषयांवर सुंदर चित्रे साकारली.

स्पर्धेच्या उद्घाटनप्रसंगी केंद्रप्रमुख श्री. राम निकम यांच्या उपस्थितीत कार्यक्रमाची सुरुवात झाली. यावेळी विद्यालयाचे प्राचार्य श्री. बाळासाहेब पारखे, उपमुख्याध्यापक श्री. अनिल देडे, पर्यवेक्षक श्री. सुदाम वराट, समारंभ प्रमुख श्री. नरेंद्र डहाळे, श्री. निलेश भोसले, श्री. विजय क्षीरसागर तसेच कलाशिक्षक श्री. राऊत मुकुंद व श्रीमती संगीता दराडे उपस्थित होते.

या स्पर्धेत विद्यार्थ्यांनी मोठ्या उत्साहाने सहभाग नोंदवित आपल्या कलागुणांचे दर्शन घडविले. रंग, रेषा आणि कल्पनाशक्तीच्या माध्यमातून विद्यार्थ्यांनी विविध विषयांचे आकर्षक चित्रण केले.

स्पर्धेमुळे विद्यार्थ्यांना आपल्या कलात्मक कौशल्याला व्यासपीठ मिळाले असून, त्यांच्या सर्जनशीलतेला प्रोत्साहन मिळाले. विद्यालयातील शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी तसेच विद्यार्थ्यांनी स्पर्धेच्या आयोजनासाठी सहकार्य केले.

विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव देणाऱ्या अशा उपक्रमांमुळे शालेय जीवनात सर्जनशीलता, निरीक्षणशक्ती आणि आत्मविश्वास वाढण्यास मदत होते, असे उपस्थितांनी सांगितले.

राज्यस्तरीय बाल चित्रकला स्पर्धेमुळे ल. ना. होशिंग विद्यालयाचा परिसर रंगांच्या उधळणीने आणि विद्यार्थ्यांच्या उत्साहाने अक्षरशः फुलून गेला होता.

NO COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

error: Content is protected !!