अण्णा भाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त १ ऑगस्टला ‘लेखन प्रेरणा दिन’ साजरा करा; उच्च व तंत्र शिक्षण विभागाचे शासन परिपत्रक विद्यापीठे, महाविद्यालये व शैक्षणिक संस्थांमध्ये कविता, कथा, निबंध स्पर्धा, व्याख्याने, ग्रंथदिंडी व साहित्य चर्चासत्रांचे आयोजन करण्याच्या सूचना
अण्णा भाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त १ ऑगस्टला ‘लेखन प्रेरणा दिन’ साजरा करा; उच्च व तंत्र शिक्षण विभागाचे शासन परिपत्रक
विद्यापीठे, महाविद्यालये व शैक्षणिक संस्थांमध्ये कविता, कथा, निबंध स्पर्धा, व्याख्याने, ग्रंथदिंडी व साहित्य चर्चासत्रांचे आयोजन करण्याच्या सूचना
लोकशाहीर, साहित्यरत्न अण्णा भाऊ साठे यांच्या साहित्यिक योगदानाची आठवण जपण्यासाठी महाराष्ट्र शासनाच्या उच्च व तंत्र शिक्षण विभागाने त्यांच्या १ ऑगस्ट या जन्मदिवसानिमित्त राज्यातील सर्व विद्यापीठे, महाविद्यालये व उच्च शिक्षण संस्थांमध्ये “लेखन प्रेरणा दिन” साजरा करण्याचे निर्देश दिले आहेत. याबाबतचे शासन परिपत्रक २९ जुलै २०२६ रोजी जारी करण्यात आले आहे.
शासनाने प्रसिद्ध केलेल्या परिपत्रकात अण्णा भाऊ साठे यांनी आपल्या अलौकिक प्रतिभेच्या जोरावर मराठी साहित्याला दिलेले अमूल्य योगदान अधोरेखित केले आहे. अत्यंत प्रतिकूल परिस्थितीतून जागतिक कीर्तीचे साहित्यिक म्हणून त्यांनी मिळविलेले स्थान विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी असल्याचे नमूद करण्यात आले आहे.
याच पार्श्वभूमीवर विद्यार्थ्यांमध्ये लेखनाची आवड निर्माण व्हावी, मराठी साहित्याबद्दल प्रेम वाढावे आणि नवोदित लेखक घडावेत, या उद्देशाने दरवर्षी १ ऑगस्ट हा दिवस “लेखन प्रेरणा दिन” म्हणून साजरा करण्यास मान्यता देण्यात आली आहे.
विविध उपक्रमांचे आयोजन या निमित्ताने राज्यातील सर्व शैक्षणिक संस्थांमध्ये खालील उपक्रम राबविण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. कविता, कथा, निबंध लेखन स्पर्धा वक्तृत्व व वादविवाद स्पर्धा स्थानिक साहित्यिकांच्या मुलाखती व व्याख्याने ग्रंथदिंडीचे आयोजन करून वाचन संस्कृतीला प्रोत्साहन अण्णा भाऊ साठे यांच्या कथा, कादंबऱ्या, प्रवासवर्णन व लोकनाट्यांचे सामूहिक वाचन त्यांच्या व्यक्तिमत्त्व व साहित्यावर व्याख्याने चर्चासत्र, परिसंवाद, कार्यशाळा व साहित्य संमेलनांचे आयोजन परिपत्रकानुसार उच्च शिक्षण, तंत्र शिक्षण व कला विभागाच्या संचालकांनी त्यांच्या अधिपत्याखालील सर्व विद्यापीठे, महाविद्यालये व संस्थांना याबाबत आवश्यक सूचना देण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.
या निर्णयामुळे विद्यार्थ्यांमध्ये साहित्य लेखनाची प्रेरणा निर्माण होण्यास, वाचन संस्कृतीला चालना मिळण्यास आणि अण्णा भाऊ साठे यांच्या साहित्याचा अधिक व्यापक प्रसार होण्यास मदत होईल, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली आहे.
लोकशाहीर अण्णाभाऊ साठे हे महाराष्ट्रातील एक महान समाजसुधारक, लोककवी आणि मराठी विकिपीडिया साहित्याचे संस्थापक होते. त्यांचा जन्म १ ऑगस्ट १९२० रोजी सांगली जिल्ह्यातील वाटेगाव येथे झाला आणि १८ जुलै १९६९ रोजी त्यांचे निधन झाले. त्यांनी दलित साहित्य आणि संयुक्त महाराष्ट्र चळवळीत मोलाचे योगदान दिले