Home ताज्या बातम्या आरोग्य हीच खरी सेवा; जामखेडमध्ये लवकरच शिवसेना वैद्यकीय कक्ष – आकाश बाफना...

आरोग्य हीच खरी सेवा; जामखेडमध्ये लवकरच शिवसेना वैद्यकीय कक्ष – आकाश बाफना राम रेपाळे यांच्या वाढदिवसानिमित्त तपनेश्वर जिल्हा परिषद शाळेस प्रथमोपचार किटचे वाटप

0
4

जामखेड न्युज – – – – – – 

आरोग्य हीच खरी सेवा; जामखेडमध्ये लवकरच शिवसेना वैद्यकीय कक्ष – आकाश बाफना

राम रेपाळे यांच्या वाढदिवसानिमित्त तपनेश्वर जिल्हा परिषद शाळेस प्रथमोपचार किटचे वाटप

 

विद्यार्थ्यांच्या आरोग्याची काळजी घेणे ही समाजाची सामूहिक जबाबदारी असून, शाळांमध्ये प्रथमोपचाराची सुविधा उपलब्ध असणे अत्यंत आवश्यक आहे. एखाद्या विद्यार्थ्याला दुखापत किंवा अचानक आरोग्याची समस्या उद्भवल्यास तातडीने उपचार मिळावेत या उद्देशाने जामखेड तालुक्यातील शाळांमध्ये प्रथमोपचार पेट्यांचे वाटप सुरू करण्यात आले आहे, अशी माहिती युवा नेते आकाश बाफना यांनी दिली.

शिवसेना महाराष्ट्र राज्याचे पक्ष सचिव राम रेपाळे यांच्या वाढदिवसानिमित्त, आरोग्यदूत मंगेश चिवटे यांच्या मार्गदर्शनाखाली युवा नेते आकाश बाफना यांच्या संकल्पनेतून तसेच सामाजिक कार्यकर्त्या पायलताई बाफना मित्र परिवार आणि शिवसेना जामखेड तालुका यांच्या संयुक्त विद्यमाने मंगळवार (दि. २८ जुलै) रोजी जामखेड शहरातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा तपनेश्वर तसेच जिल्हा परिषद प्राथमिक शाळा (मुले व मुली) येथे प्रथमोपचार पेट्यांचे वाटप करण्यात आले.

यावेळी उपस्थितांना मार्गदर्शन करताना आकाश बाफना म्हणाले की, “आरोग्य हीच खरी सेवा असून, सर्वसामान्य नागरिकांना वेळेत वैद्यकीय मदत मिळणे ही काळाची गरज आहे. पुढील काळात जामखेड शहरासह तालुक्यात विविध आरोग्यविषयक सेवा उपलब्ध करून देण्याचा आमचा संकल्प आहे.

नागरिकांना वैद्यकीय सल्ला, मार्गदर्शन आणि आवश्यक मदत सहज मिळावी यासाठी जामखेड शहरात लवकरच शिवसेना वैद्यकीय कक्ष सुरू करण्यात येणार आहे.”

या उपक्रमाचे पालक, शिक्षक व ग्रामस्थांनी स्वागत करत विद्यार्थ्यांच्या आरोग्य सुरक्षेसाठी हा उपक्रम अत्यंत उपयुक्त असल्याची भावना व्यक्त केली.
कार्यक्रमास शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष धनराज पवार, शिवसेना नेते पांडुरंग माने, स्वप्निल खाडे, विकी पिंपळे, अशोक कुमटकर, दत्तात्रय जगताप, ज्येष्ठ शिक्षिका जयश्री मुकणे, मुख्याध्यापक मच्छिंद्र खैरे, उपाध्यापिका जयश्री पाटील, मंगल सोलंकर, माता-पालक रेखा बळे, पूजा कुलकर्णी, गीता जिरेकर, कविता भोसले, नीता भोसले, शितल क्षिरसागर, अंगणवाडी सेविका शुभांगी अडाले, शिवकन्या राजगुरू तसेच पालक, विद्यार्थी आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सूत्रसंचालन मुख्याध्यापक मच्छिंद्र खैरे यांनी केले, तर आभारप्रदर्शन शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष धनराज पवार यांनी मानले. विद्यार्थ्यांच्या आरोग्य संरक्षणासाठी राबविण्यात आलेल्या या उपक्रमाचे परिसरात कौतुक होत आहे.

NO COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

error: Content is protected !!