जामखेडमध्ये फिनोलेक्स व शितल कलेक्शनच्या वतीने वारकऱ्यांना उपयुक्त साहित्य वाटप
संत वामनभाऊ पालखीचे तपनेश्वर रोडवर भव्य स्वागत
जामखेड शहरातून जाणाऱ्या संत वामनभाऊ महाराज पालखी सोहळ्यातील वारकऱ्यांचे फिनोलेक्स पाईप्स कंपनी आणि शितल कलेक्शन, जामखेड यांच्या वतीने भक्तिभावाने स्वागत करून त्यांना प्रवासासाठी उपयुक्त साहित्याचे वाटप करण्यात आले.
प्रवासात वारकऱ्यांना होणाऱ्या अडचणी लक्षात घेऊन काठी, पिशवी आणि रेनकोट यांचे मोफत वाटप करण्यात आले. या उपक्रमामुळे शेकडो वारकऱ्यांनी लाभ घेतला.
स्वागत कमानीतून भव्य स्वागत जामखेड शहरातील तपनेश्वर रोड येथे पालखी सोहळ्याच्या स्वागतासाठी भव्य स्वागत कमान उभारण्यात आली होती. कमानीच्या दोन्ही बाजूला साहित्य वाटपासाठी स्टॉल्स लावण्यात आले होते. संपूर्ण परिसर “ज्ञानोबा-तुकाराम” च्या गजराने दुमदुमला होता.
उपयुक्त साहित्यामुळे वारकरी खुश चालताना आधारासाठी काठी, सामानासाठी मजबूत पिशवी आणि पावसापासून बचावासाठी रेनकोट मिळाल्याने वारकऱ्यांनी आनंद व्यक्त केला. अनेक वारकऱ्यांनी संयोजकांचे आभार मानले.
अंदुरे कुटुंबाचा सेवाभावी उपक्रम हा उपक्रम फिनोलेक्स कंपनीचे डिलर आणि शितल कलेक्शनचे संचालक अंदुरे कुटुंबीयांच्या संकल्पनेतून राबविण्यात आला. अंदुरे कुटुंबातील सर्व सदस्य वारीच्या स्वागतासाठी सकाळपासूनच सज्ज होते. विठ्ठल-रुक्मिणीच्या वेशातील चिमुकल्यांनी केलेल्या स्वागताने सर्वांचे लक्ष वेधून घेतले.
याप्रसंगी फिनोलेक्स कंपनीचे एरिया सेल्स मॅनेजर श्री. योगेश राऊत, एरिया असिस्टंट सेल्स मॅनेजर श्री. दादासाहेब गडाख, शितल ट्रेडर्सचे संचालक श्री. उमाकांत रावसाहेब अंदुरे, श्री. सागर उमाकांत अंदुरे, श्री. गजानन अंदुरे, श्री. वसंत दादा कोळपकर, श्री. महेश मासाळ, श्री. मनोजशेठ गुग्गड यांच्यासह शितल कलेक्शन व शितल ट्रेडर्सचा संपूर्ण स्टाफ उपस्थित होता. साहित्य वाटपासाठी *महिलांनी देखील मोठ्या संख्येने सहभाग नोंदवला.
धार्मिक कार्यात सामाजिक संस्थांनी पुढाकार घेऊन केलेल्या या उपक्रमाचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे.