Saturday, July 11, 2026
Home ताज्या बातम्या जामखेड महाविद्यालयात जागतिक लोकसंख्या दिन उत्साहात साजरा

जामखेड महाविद्यालयात जागतिक लोकसंख्या दिन उत्साहात साजरा

0
4

जामखेड न्युज – – – – – 

जामखेड महाविद्यालयात जागतिक लोकसंख्या दिन उत्साहात साजरा

दि पिपल्स एज्युकेशन सोसायटी संचलित जामखेड महाविद्यालय, जामखेड येथे भूगोल विभागाच्या वतीने जागतिक लोकसंख्या दिन उत्साहपूर्ण वातावरणात साजरा करण्यात आला. यावर्षीच्या “तरुणांच्या आशा आणि आकांक्षा आज आणि भविष्यासाठी साकार करणे” या संकल्पनेवर आधारित या कार्यक्रमात विद्यार्थ्यांना लोकसंख्या, शिक्षण, आरोग्य आणि शाश्वत विकास याविषयी मार्गदर्शन करण्यात आले.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य डॉ. गौतम केळकर होते. प्रमुख वक्ते म्हणून उपप्राचार्य तथा भूगोल विभागप्रमुख डॉ. सुनील नरके यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.

यावेळी राज्यशास्त्र विभागाचे प्रा. विशाल रेडे, भूगोल विभागाचे कर्मचारी श्री. किशोर सातपुते, प्राध्यापक, शिक्षकेत्तर कर्मचारी आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

प्रास्ताविकात जागतिक लोकसंख्या दिनाचे महत्त्व स्पष्ट करण्यात आले. प्रमुख वक्ते डॉ. सुनील नरके यांनी लोकसंख्या ही केवळ जनगणनेपुरती मर्यादित नसून देशाच्या सामाजिक, आर्थिक आणि राजकीय विकासासाठी विविध योजना आखताना लोकसंख्येच्या आकडेवारीला महत्त्वाचे स्थान असल्याचे सांगितले.

तसेच तरुणांनी उच्च शिक्षण घ्यावे, स्त्री-पुरुष समानतेचा स्वीकार करावा, सर्व नागरिकांना समान संधी उपलब्ध व्हाव्यात, पर्यावरण संरक्षणाची जबाबदारी पार पाडावी आणि देशाला सुजलाम-सुफलाम करण्यासाठी योगदान द्यावे, असे आवाहन त्यांनी केले.

अध्यक्षीय समारोपात डॉ. गौतम केळकर यांनी यावर्षीच्या संकल्पनेनुसार तरुणांच्या शिक्षण, आरोग्य, प्रजनन हक्क, समान संधी आणि त्यांच्या भविष्यकालीन आकांक्षांना सक्षम पाठबळ देणे ही काळाची गरज असल्याचे प्रतिपादन केले.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. तुषार मिसाळ यांनी केले, तर आभार प्रदर्शन प्रा. लहू अडाले .यांनी मानले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

error: Content is protected !!