Wednesday, July 8, 2026
Home ताज्या बातम्या जिल्हा नियोजन समितीत भाजपचे अजय काशिद तज्ञ सदस्य तर राष्ट्रवादी काँग्रेसच्या संध्या...

जिल्हा नियोजन समितीत भाजपचे अजय काशिद तज्ञ सदस्य तर राष्ट्रवादी काँग्रेसच्या संध्या सोनवणे विशेष आमंत्रित सदस म्हणून निवड

0
17

जामखेड न्युज – – – – – – 

जिल्हा नियोजन समितीत भाजपचे अजय काशिद तज्ञ सदस्य तर राष्ट्रवादी काँग्रेसच्या संध्या सोनवणे विशेष आमंत्रित सदस म्हणून निवड

अहिल्यानगर जिल्हा नियोजन समितीच्या तज्ञ सदस्यपदी भाजपचे अजय काशीद तर राष्ट्रवादी काँग्रेसच्या (अजित पवार) संध्या सोनवणे यांची विशेष निमंत्रित सदस्य म्हणून निवड करण्यात आली आहे. जिल्ह्य़ाचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील हे अध्यक्ष तर जिल्ह्य़ाधिकारी डॉ. पंकज आशिया हे या नियोजन मंडळाचे सचिव आहेत. त्यामुळे काशीद व साळवे यांच्या निवडीचे तालुक्यातून स्वागत होत आहे.

विधानपरिषदेचे सभापती प्रा. राम शिंदे यांच्या नेतृत्वाखालील अजय काशिद हे जामखेड तालुक्यात काम करत असून सारोळा गावचे १५ वर्षापासून सरपंच, भाजप तालुकाध्यक्ष, जिल्हा सरचिटणीस असे विविध पदांवर काम केले आहे. तर संध्या सोनवणे ही राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) युवती प्रदेश सरचिटणीस असून राज्यात पक्षवाढीसाठी सातत्याने काम करत आहेत.

जामखेड शहरात मागील पाच वर्षापासून छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा फुले व भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची एकत्रित जयंती साजरी करण्यात पुढाकार आहे. तसेच महिलांसाठी विविध उपक्रम व प्रश्न सोडविण्यासाठी कार्यरत आहेत.

जिल्हा नियोजन मंडळ हे जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासाठी योजना तयार करणारी आणि विकासकामांना प्राधान्य देणारी महत्त्वाची वैधानिक समिती आहे. ग्रामीण व शहरी भागांचा समन्वय साधून विकास आराखडा तयार करणे, विविध विभागांकडून आलेल्या विकास प्रस्तावांची छाननी करणे,जिल्हा नियोजन निधीचे वाटप करणे, रस्ते, पाणीपुरवठा, शिक्षण, आरोग्य, सिंचन, पर्यटन, सार्वजनिक इमारती अशा विकासकामांना मंजुरी देणे.

मंजूर कामांचा आढावा घेणे व अंमलबजावणीवर देखरेख ठेवणे असे विविध कामे केली जात आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

error: Content is protected !!