Monday, June 22, 2026
Home ताज्या बातम्या इंदिरा इन्स्टिट्यूट कॉलेज ऑफ फार्मसी, साकतचा डी. फार्मसी परीक्षेचा १०० टक्के निकाल

इंदिरा इन्स्टिट्यूट कॉलेज ऑफ फार्मसी, साकतचा डी. फार्मसी परीक्षेचा १०० टक्के निकाल

0
2

जामखेड न्युज – – – – – – 

इंदिरा इन्स्टिट्यूट कॉलेज ऑफ फार्मसी, साकतचा डी. फार्मसी परीक्षेचा १०० टक्के निकाल

जामखेड तालुक्यातील साकत येथील इंदिरा इन्स्टिट्यूट कॉलेज ऑफ फार्मसीने महाराष्ट्र राज्य तंत्रशिक्षण मंडळाच्या (MSBTE) उन्हाळी परीक्षा २०२६ मध्ये उल्लेखनीय यश संपादन केले आहे. महाविद्यालयाने डी. फार्मसी प्रथम व द्वितीय वर्षाचा १०० टक्के निकाल लावून उत्कृष्ट शैक्षणिक परंपरा कायम राखली आहे.

महाविद्यालयाच्या या यशामुळे विद्यार्थी, पालक आणि शिक्षकांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. गुणवत्तापूर्ण शिक्षण, अनुभवी प्राध्यापक वर्ग, अत्याधुनिक प्रयोगशाळा आणि विद्यार्थीकेंद्रित शैक्षणिक उपक्रमांच्या बळावर हे यश संपादन करण्यात महाविद्यालयाला यश आले आहे.

प्रथम वर्षात
रेडे गणेश बिभीषण यांनी ८१.०० टक्के गुणांसह प्रथम क्रमांक पटकावला.
शिंदे ऋतुजा शांताराम (८०.१० टक्के) यांनी द्वितीय, वायकर पूजा अरविंद (७९.८० टक्के) यांनी तृतीय,
खांबे ओंकार (७९.६० टक्के) यांनी चतुर्थ,तर शेख अशना (७९.२० टक्के) यांनी पाचवा क्रमांक मिळवला.

द्वितीय वर्षात
आंधळे रेश्मा बबन यांनी ७६.१८ टक्के गुणांसह प्रथम क्रमांक मिळवला.
शेख नाझमीन सलीम (७३.३६ टक्के) यांनी द्वितीय,कुऱ्हाडे करिश्मा निवृत्ती (७३.२७ टक्के) यांनी तृतीय,
अवसरे विजय रमेश (७३.०० टक्के) यांनी चतुर्थ, तर लबाटे विठ्ठल रामराव (७२.०९ टक्के) यांनी पाचवा क्रमांक पटकावला.

महाविद्यालयातील अनुभवी प्राध्यापक वर्ग, आधुनिक प्रयोगशाळा, गुणवत्तापूर्ण शिक्षण तसेच विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी राबविण्यात येणाऱ्या विविध उपक्रमांमुळे हे यश शक्य झाल्याचे महाविद्यालयाचे प्राचार्य यांनी सांगितले.

विद्यार्थ्यांना उद्योग क्षेत्रातील अद्ययावत ज्ञान व व्यावहारिक अनुभव मिळावा यासाठी केमिस्ट असोसिएशनमधील तज्ज्ञ, नामवंत डॉक्टर आणि फार्मसी क्षेत्रातील अनुभवी व्यक्तींची नियमित अतिथी व्याख्याने आयोजित केली जातात.

 

याशिवाय विद्यार्थ्यांच्या शारीरिक व मानसिक विकासासाठी महाविद्यालयात विविध क्रीडा सुविधा, प्रशस्त क्रीडांगण तसेच व्यक्तिमत्त्व विकास आणि व्यावसायिक कौशल्यवृद्धीसाठी विशेष उपक्रम राबविण्यात येतात. शिक्षणाबरोबरच विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासावर महाविद्यालय विशेष भर देत आहे.

या उल्लेखनीय यशाबद्दल यशस्वी विद्यार्थ्यांचे संस्थेच्या अध्यक्षा मा. डॉ. पल्लवी सूर्यवंशी मॅडम, सचिव मा. सुहास सूर्यवंशी सर, प्राचार्य, संचालक, सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी अभिनंदन करून त्यांच्या भावी वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

error: Content is protected !!