जामखेड न्युज – – – – – –
रयत सेवकांच्या प्रत्येक अडचणीत खंबीरपणे सोबत राहणार – राजेंद्र कोठारी
कोठारी यांचा सत्कार संपन्न

“कर्मवीर भाऊराव पाटलांनी १०५ वर्षांपूर्वी लावलेले रयत शिक्षण संस्थेचे रोपटे आज वटवृक्ष झाले आहे. हा वटवृक्ष टिकला तरच महाराष्ट्रातील बहुजन, वंचित, कष्टकरी समाजाच्या शिक्षणाचा पाया टिकेल” तसेच ग्रामीण-शहरी विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण देण्यासाठी रयत कटिबद्ध असेल रयत सेवकांच्या प्रत्येक अडचणीत खंबीरपणे सोबत राहणार असे मत राजेंद्र कोठारी यांची व्यक्त केले.

रयत शिक्षण संस्थेच्या उत्तर विभागीय समन्वय समितीवर राजेंद्र कोठारी यांची निवड झाल्याबद्दल शैक्षणिक, सामाजिक व राजकीय क्षेत्रातील मान्यवरांच्या वतीने सत्कार आयोजित करण्यात आला होता.
यावेळी ज्येष्ठ शिक्षकनेते शिवाजीराव ढाळे, दिलीप ढवळे,कुंडल राळेभात, मुख्याध्यापिका आर आर भोर,
प्रा.लक्ष्मण ढेपे , नगरसेवक राजेंद्र गोरे,
माध्यमिक शिक्षक संघटनेचे तालुकाध्यक्ष सुदाम वराट, पत्रकार अविनाश बोधले, शिवाजी ईकडे, नासीर चाचू, मा.ग्रा.पं. सदस्य बाबासाहेब मगर, ज्येष्ठ नेते बिभीषण परकड, प्रकाश काळे, प्रा.राहुल आहिरे,दादा महाडिक,अमोल लोहकरे, सचिन शिंदे, बजरंग डुचे, सह दिलीप ढवळे, मोहन यादव, चंद्रकांत डुचे, प्रा.सागर फुंदे, मयुर भोसले, संदीप टेकाळे, अमोल भोंडवे, अशोक आव्हाड, सचिन शिंदे, दादा महाडिक, हनुमंत कोरे, सतिश टेकाळे, सह आजी माझी रयत सेवक उपस्थित होते.

यावेळी लक्ष्मण ढेपे, मुख्याध्यापिका भोर आरआर,कुंडल राळेभात,प्रकाश काळे, सुदाम वराट आदी मान्यवरांनी मनोगत व्यक्त करून शुभेच्छा दिल्या.

ज्येष्ठ नेते शिवाजीराव ढाळे यांनी रयत शिक्षण संस्था उत्तर विभाग सन्मान व सदस्य पदी निवड झाल्याबद्दल निवड झाल्याबद्दल हार्दिक अभिनंदन केले व कर्मवीर आण्णा यांचा त्याग आजचा रयतचा विकास याबद्दल सविस्तर माहिती दिली व सर्वांच्या वतीने शुभेच्छा दिल्या

यावेळी बोलताना राजेंद्र कोठारी म्हणाले की, “स्वातंत्र्यपूर्व काळात शिक्षण हे मूठभरांचे होते. भाऊरावांनी ‘मागितलेली दान, मिळवलेले ज्ञान’ या तत्वावर शाळा उघडल्या. माळावरल्या धनगराच्या, शेतकऱ्याच्या, दलिताच्या पोराला शिकवले. आज रयतच्या ६७५ शाखांमध्ये शिकणारी ४.५ लाख मुले ही बहुजनांचीच आहेत. ग्रामीण-शहरी विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण देण्यासाठी रयत कटिबद्ध आहे, रयत सेवकांच्या प्रत्येक अडचणीत खंबीरपणे सोबत राहणार आहोत.




