जामखेड शहराच्या पाणीटंचाईची समस्या सोडवण्यासाठी तातडीने उपाययोजना करू – नगराध्यक्षा प्रांजल चिंतामणी टंचाई काळात पाण्याचा अपव्यय करू नका, पाणी जपुन वापरावे – उपनगराध्यक्ष पोपट राळेभात.
जामखेड शहराच्या पाणीटंचाईची समस्या सोडवण्यासाठी तातडीने उपाययोजना करू – नगराध्यक्षा प्रांजल चिंतामणी
टंचाई काळात पाण्याचा अपव्यय करू नका, पाणी जपुन वापरावे – उपनगराध्यक्ष पोपट राळेभात.
जामखेड शहराला वरदान आसलेल्या भुतवडा तलावातील पाणी साठा व वितरण व्यवस्थेची प्रत्यक्ष स्थळपहाणी आज रोजी जामखेड नगरपरिषदेच्या वतीने करण्यात आली.
यावेळी बोलताना नगराध्यक्षा प्रांजल चिंतामणी म्हणाल्या की सद्दय परिस्थितीत तलावात पुढील दोन महिने पुरेल ऐवढा पाणीसाठा उपलब्ध आसुन लवकरच वरून राजाचे आगमन होईल आता शहरातील नागरिकांना टंचाईच्या झळा बसत आहेत आठ ते दहा दिवसाला पाणीपुरवठा होत आहे.
यावर उपयोजना करून तो कालावधी कमी करण्याचा आम्ही प्रयत्न करत आहोत तसेच सभापती प्रा राम शिंदे यांच्या प्रयत्नांतून पुढील काळात जामखेडकरांना उजनीचे मुबलक पाणी मिळणार आसुन त्या योजनेचे काम प्रगतीपथावर आहे आसे सांगितले.
तसेच उपनगराध्यक्ष पोपटनाना राळेभात म्हणाले की यावर्षीचा उन्हाळा आत्यंत कडक आसल्याने उदभवामधील पाणी झपाटय़ाने कमी होत आहे त्यामुळे नागरिकांनी पाण्याचा वापर काटकसरीने करावा आसे सांगितले.
तसेच शिवसेना तालुकाप्रमुख प्रा. कैलास माने बोलताना म्हणाले की दरवर्षी प्रमाणे या वेळीही जामखेडकरांना पाणी टंचाई भासत आहे त्यामुळेच नगराध्यक्षा प्रांजल चिंतामणी यांनी भुतवडा तलावातील पाणी साठ्याच्या उपलब्धतेची पहाणी केली आहे आणी जरी पाऊस लांबला तरीही दोन महिने भुतवडा तलावातून शहरासाठी पाणीपुरवठा होऊ शकतो आसे सांगितले.
मुख्याधिकारी अजय साळवे म्हणाले की जामखेड नगरपरिषदेच्या मासीक मिटींगमध्ये टंचाईचा पार्श्वभूमीवर विहीत काळात उपाययोजना राबवण्याच्या संदर्भात ठराव घेण्यात आला होता त्या आनुशंगाने आजची ही पाहाणी करण्यात आली आसुन प्राप्त परिस्थितीचा आढावा घेऊन पुढील पाणी व्यवस्थापनेचे नियोजन करून आज रोजी स्थळपहाणी केली आहे.
पाण्याची पातळी तपासली आसुन ती खालावलेली आसुन पाणीपुरवठा करण्यासाठी आवहानाचा सामना करावा लागत आहे त्याबाबत संबंधित विभागाना तशा सुचना देऊन पाणी पुरवठ्याचे नियोजन नगरपरिषद प्रशासनाच्या वतीने सर्व पदाधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात येणार आहे