सभापती प्रा. राम शिंदे यांच्या पाठपुराव्यामुळे अतिवृष्टीग्रस्त ५२७ शेतकऱ्यांना आर्थिक मदत ; ७८ लाखांचे अनुदान विहीर दुरुस्तीसाठी, दोन टप्प्यांत होणार निधी वितरण
सभापती प्रा. राम शिंदे यांच्या पाठपुराव्यामुळे अतिवृष्टीग्रस्त ५२७ शेतकऱ्यांना आर्थिक मदत ; ७८ लाखांचे अनुदान
विहीर दुरुस्तीसाठी, दोन टप्प्यांत होणार निधी वितरण
२०२५-२६ खरिप हंगामातील अतिवृष्टी व पुरस्थितीमुळे खचलेल्या व बुजलेल्या सिंचन विहीरीच्या दुरुस्ती कामासाठी नुकसान झालेल्या जामखेड तालुक्यातील शेतकऱ्यांना मोठा आर्थिक दिलासा मिळाला आहे.
जिल्हाधिकारी कार्यालय, अहिल्यानगर यांच्या माध्यमातून नुकसानग्रस्त शेतकऱ्यांसाठी अनुदान निधी मंजूर करण्यात आला आहे.महाराष्ट्र राज्य विधानपरिषदेचे सभापती प्रा. राम शिंदे यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे यश आले आहे.
प्राप्त आदेशानुसार जामखेड तालुक्यातील शेतकऱ्यांना दोन टप्प्यांत निधी वितरित करण्यात येणार असून, पहिल्या आदेशात ही१२८ शेतकऱ्यांसाठी सुमारे १८ लाख ६८ हजारांचा निधी मंजूर करण्यात आला आहे.
तर दुसऱ्या आदेशात ३९८ लाभार्थी शेतकऱ्यांसाठी सुमारे ५९ लाख ७४ हजार अधिक निधी मंजूर करण्यात आले आहे.
या दोन्ही आदेशांमधून जामखेड तालुक्यातील एकूण ५२७ शेतकऱ्यांना सुमारे ७८ लाख ४२ हजार रुपये आर्थिक मदत मिळणार असल्याची माहिती समोर आली आहे.प्रा. राम शिंदे यांनी शासन स्तरावर सातत्याने पाठपुरावा करून जामखेड तालुक्यातील शेतकऱ्यांना न्याय मिळवून दिल्याची भावना शेतकऱ्यांकडून व्यक्त होत आहे.
या मदतीमुळे नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे.असे मत बाजार समितीचे सभापती पै.शरद कार्ले यांनी व्यक्त केले आहे.