Home ताज्या बातम्या देशव्यापी ‘औषध बंद’ मध्ये जामखेड मधिल केमिस्टही होणार सहभागी, तहसीलदार व...

देशव्यापी ‘औषध बंद’ मध्ये जामखेड मधिल केमिस्टही होणार सहभागी, तहसीलदार व पोलीस प्रशासनास दिले निवेदन

0
4

जामखेड न्युज – – – – – – – 

देशव्यापी ‘औषध बंद’ मध्ये जामखेड मधिल केमिस्टही होणार सहभागी,

तहसीलदार व पोलीस प्रशासनास दिले निवेदन

 

ई-फार्मसीद्वारे होणारी औषध विक्री, मोठ्या कंपन्यांचे आक्रमक किंमत धोरण तसेच केंद्र सरकारच्या जीएसआर २२० (ई) व जीएसआर ५८१ (ई) अधिसूचना मागे घेण्याच्या मागणीसाठी अखिल भारतीय औषधी विक्रेता संघटनेने बुधवार (दि. २० मे) रोजी देशव्यापी बंदची हाक दिली आहे.

याबाबत तहसीलदार व पोलीस प्रशासनाला निवेदन देण्यात आले आहे. हा बंद जामखेड तालुक्यात यशस्वी करण्यासाठी सर्व औषध विक्रेत्यांनी एकजूट दर्शविली असून तालुक्यातील सर्व केमिस्ट या आंदोलनात सहभागी होणार असल्याची माहिती जामखेड तालुका केमिस्ट ॲन्ड ड्रगिस्ट असोसिएशनचे अध्यक्ष तात्यासाहेब बांदल यांनी दिली आहे.

महाराष्ट्र राज्य केमिस्ट अ‍ॅन्ड ड्रगिस्ट असोसिएशन तसेच ऑल इंडिया ऑर्गनायझेशन ऑफ केमिस्ट अँड ड्रगिस्ट यांच्या वतीने यासंदर्भातील निवेदन प्रसिद्ध करण्यात आले आहे. संघटनांच्या म्हणण्यानुसार, देशभरातील सुमारे १२ लाख ४० हजार औषध विक्रेत्यांच्या विविध मागण्या अद्याप प्रलंबित आहेत.

विशेषतः ई-फार्मसीद्वारे डॉक्टरांच्या प्रिस्क्रिप्शनची पुरेशी पडताळणी न करता औषध विक्री होत असल्याने स्व – औषधोपचाराचे प्रमाण वाढत असल्याचा आरोप करण्यात आला आहे. जामखेड तालुक्यातील सर्व केमिस्ट राष्ट्रीय अध्यक्ष आप्पासाहेब शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली या आंदोलनात सहभागी होणार असून मंगळवार (दि. १९ मे) मध्यरात्रीपासून बुधवार (दि. २० मे) मध्यरात्रीपर्यंत बंद पाळण्यात येणार असल्याचे जामखेड तालुका केमिस्ट असोसिएशनने दिलेल्या निवेदनात म्हटले आहे.

निवेदन देतावेळी जामखेड तालुका केमिस्ट एन्ड ड्रगिस्ट असोसिएशनचे अध्यक्ष तात्यासाहेब बांदल, विनोद जाधव, शभम खेञे, सागर बाबर, विशाल भोजने, अरूण ऊगले, युवराज जगताप, अक्षय काळे, अरबाज सय्यद, शफि शेख, महेश नारके, अनिल अडाले, कय्युम शेख, ऊजेपा शेख, संदिप ठोबरे सह तालुक्यातील आनेक केमिस्ट बांधव उपस्थित होते.

चौकट

जामखेड तालुका केमिस्ट असोसिएशनचे अध्यक्ष तात्यासाहेब बांदल हे स्वतः फीरुन केमिस्ट बांधवांना आपली मेडीकल दुकाने दि २० मे रोजी बंद ठेवण्याचे आवाहन करत आहेत. या आवाहनाला तालुक्यातील केमिस्ट बांधव चांगला प्रतिसाद देत आहेत. बंद दरम्यान कोठल्याही इमर्जन्सी रुग्णाची गैरसोय होणार नाही यासाठी त्या दिवशी फक्त दोन मेडीकल दुकाने सुरू रहातील अशी माहिती जामखेड तालुका केमिस्ट असोसिएशनचे अध्यक्ष तात्यासाहेब बांदल यांनी दिली.

NO COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

error: Content is protected !!