Home शैक्षणिक बातम्या नीट पेपरफुटी चे अहिल्यानगर कनेक्शन नीट परीक्षेतील सुधारणांकडे सरकारचे दुर्लक्ष

नीट पेपरफुटी चे अहिल्यानगर कनेक्शन नीट परीक्षेतील सुधारणांकडे सरकारचे दुर्लक्ष

0
7

जामखेड न्युज – – – – – 

नीट पेपरफुटी चे अहिल्यानगर कनेक्शन

नीट परीक्षेतील सुधारणांकडे सरकारचे दुर्लक्ष

नीट परीक्षेत २०२४ मध्ये गैरव्यवहार झाला होता केंद्र सरकारने यावर उपाय सुचविण्यासाठी इस्त्रो चे माजी अध्यक्ष प्रा. के राधाकृष्णन यांच्या अध्यक्षतेखाली समिती नियुक्त केली होती. परीक्षा आयोजनातील ताण कमी करणे परीक्षा सुरक्षित करणे, नीट व्यवस्थेत बदल सुचविले होते पण सरकारने याकडे दुर्लक्ष करत काहीही बदल केले नाहीत यामुळे पुन्हा दोन वर्षांत पेपरफुटी मुळे देशभरात मोठा गोंधळ निर्माण झाला आहे.

नीट neet पेपरफुटी प्रकरणी CBI ने अहिल्यानगर जिल्ह्यातील राहुरी तालुक्यातील एका गावातील धनंजय लोखंडे याला ताब्यात घेतले आहे. दरम्यान पुण्यातून मनीषा वाघमारे या महिलेला ताब्यात घेतले आहे. यामुळे अहिल्यानगर कनेक्शन उघड झाले असून तालुकावार एजंट असल्याची चर्चा आहे आता चिंगळ्या सापडल्या आहेत मोठा मासा कधी सापडणार असा प्रश्न सामान्य जनता विचारत आहे. नीट (NEET) परीक्षेच्या पेपरफुटी प्रकरणात केंद्रीय अन्वेषण विभागाने (CBI) या प्रकरणी मोठी कारवाई केली आहे. CBI ने अहिल्यानगर जिल्ह्यातील राहुरी तालुक्यातील महाडूक सेंटर येथील धनंजय निवृत्ती लोखंडे (वय २६) या संशयित तरुणाला ताब्यात घेतले आहे. धनंजय लोखंडे हा पुण्यात वाघोली परिसरात राहत होता आणि वैद्यकीय प्रवेश परीक्षांसाठी ॲडमिशन कन्सल्टिंगचे काम करत होता.

केंद्रीय अन्वेषण विभागाने (CBI) बुधवारी अहिल्यानगर जिल्ह्यातील एका संशयित व्यक्तीला ताब्यात घेत त्याची चौकशी सुरू केली आहे.त्याच बरोबर त्याचे दोन साथीदारांनाही सीबीआई ने ताब्यात घेतले. चौकशी केल्यानंतर यातील दोघांना सीबीआयने सोडून दिले तर धनंजय लोखंडे याला अटक करण्यात आली.

राहुरी तालुक्यातील महाडूक सेंटर या गावातून धनंजय लोखंडे या युवकाला केंद्रीय गुन्हे अन्वेषण विभागाने अटक केली असून त्याला न्यायालयात नेण्यात आले आहे. न्यायालयातून त्यांना ट्रांझिट रिमांड घेऊन लोखंडे यास सीबीआयचे अधिकारी दिल्लीला नेण्यात आले.

लोखंडे याची दिवसभरामध्ये सकाळी 11 वाजल्यापासून सहा वाजेपर्यंत चौकशी सुरू होती. त्याच्यासोबत इतर दोघांनाही सीबीआयने ताब्यात घेतले होते मात्र त्यांची चौकशी करून त्यांना सोडून देण्यात आले.

या तपासाच्या अनुषंगाने बुधवारी सकाळपासून CBI चे विशेष पथक अहिल्यानगर जिल्ह्यात दाखल झाले होते. स्थानिक पोलिसांच्या मदतीने संशयित व्यक्तीचा शोध घेत त्याला ताब्यात घेण्यात आले. त्यानंतर दिवसभर त्याची कसून चौकशी करण्यात आली.

सीबीआयचे तीन पथके अहिल्यानगर शहरांमध्ये यासंदर्भातील डिटेल माहिती घेत होते त्यांनी विविध बँकांमध्ये जाऊन धनंजय लोखंडे यांच्या झालेल्या व्यवहाराचे माहिती घेतली.

या व्यक्तीचा पेपरफुटी रॅकेटशी नेमका काय संबंध आहे, प्रश्नपत्रिका पुरविण्याच्या साखळीत त्याची भूमिका होती का, आर्थिक व्यवहार झाले होते का, यासह अनेक मुद्द्यांवर चौकशी सुरू असल्याची माहिती समोर येत आहे.

२०२६ ची नीट परीक्षा २२ लाख ७९ हजार ७४३ विद्यार्थ्यांनी दिली होती आता पुन्हा या विद्यार्थ्यांना परीक्षेला सामोरे जावे लागणार आहे. ३२० पैकी १२० प्रश्न फुटले होते. तसेच सुमारे वीस लाख रुपयांपासून तर शेवटच्या दिवशी पन्नास हजार रुपयांपर्यंत व्यवहार झाल्याची चर्चा सुरू आहे.

NO COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

error: Content is protected !!