Wednesday, May 13, 2026
Home ताज्या बातम्या धामणगाव परिसरात वादळी वाऱ्यासह झालेल्या पावसामुळे मोठ्या प्रमाणात नुकसान प्रशासनाने नुकसानीचे...

धामणगाव परिसरात वादळी वाऱ्यासह झालेल्या पावसामुळे मोठ्या प्रमाणात नुकसान प्रशासनाने नुकसानीचे पंचनामे करावेत – महारूद्र महारनवर

0
2

जामखेड न्युज – – – – – – 

धामणगाव परिसरात वादळी वाऱ्यासह झालेल्या पावसामुळे मोठ्या प्रमाणात नुकसान

प्रशासनाने नुकसानीचे पंचनामे करावेत – महारूद्र महारनवर

बुधवारी दुपारी अचानक झालेल्या वादळी वाऱ्यासह पावसामुळे परिसरातील शेतकऱ्यांची एकच धावपळ उडाली वादळी वाऱ्यामुळे अनेक झाडे उन्मळून पडले, घरावरील तसेच गुरांच्या गोठ्यावरील पत्रे उडाली काही ठिकाणी लाईटचे पोल पडले तसेच आंबा, कांदे, पपई पिकांचे मोठय़ा प्रमाणात नुकसान झाले आहे.

दि. १३ वार बुधवार रोजी दुपारी अचानक आलेल्या वादळी वाऱ्यासह पावसामुळे एकच हाहाकार उडाला काही लोकांचे कांदे भिजले, आंबा पिकांचे मोठय़ा प्रमाणात नुकसान झाले तसेच पपईचा बागेचेही नुकसान झाले. परिसरात अनेकांच्या घरावरील व गोठ्यावरील पत्रे उडाली, गावात टपरीवर झाड पडल्याने टपरीचे नुकसान झाले तसेच अनेक ठिकाणी झाडे उन्मळून पडले. धामणगाव परिसरात मोठय़ा प्रमाणात नुकसान झाले आहे.

परिसरातील राजेंद्र नारायण घुमरे,
दिपक किसन घुमरे, विमल मधुकर कुंभार, दत्तात्रय किसन घुमरे, सचिन शामराव घुमरे, भागवत आश्रु महारनवर, संतोष महारनवर, उर्मिला घुमरे, दादा ढाळे, संदिपन घुमरे या शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे.

शेतकऱ्यांना मोठा फटका बसला असून, कच्चे आंबे झाडांवरून खाली पडले आहेत, काढणीला आलेला कांदा तसेच काढून ठेवलेला कांदा भिजल्याने नुकसान झाले आहे.

वादळी वारे व अवकाळी पाऊसामुळे नुकसान झालेल्या पिकांचे व घरांचे
महसूल आणि कृषी विभागाने तातडीने पंचनामे करावेत अशी मागणी सरपंच महारूद्र महारनवर यांनी केली आहे. नुकसान झालेल्या शेतकऱ्यांनी ताबडतोब संपर्क करावा असे आवाहन करण्यात आले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

error: Content is protected !!