Home ताज्या बातम्या ऑल इंडिया इंटर युनिव्हर्सिटी वूशू स्पर्धेत जामखेडच्या रोहित थोरातला कांस्यपदक

ऑल इंडिया इंटर युनिव्हर्सिटी वूशू स्पर्धेत जामखेडच्या रोहित थोरातला कांस्यपदक

0
3

जामखेड न्युज – – – – – – 

ऑल इंडिया इंटर युनिव्हर्सिटी वूशू स्पर्धेत जामखेडच्या रोहित थोरातला कांस्यपदक

जम्मू – काश्मीर येथे नुकत्याच पार पडलेल्या ऑल इंडिया इंटर युनिव्हर्सिटी वूशू स्पर्धेत जामखेड येथील आयडियल स्पोर्ट अकॅडमीचा खेळाडू रोहित शिवाजी थोरात याने उल्लेखनीय कामगिरी करत कांस्यपदक पटकावले. याबद्दल त्याच्या वर अभिनंदनाचा वर्षांव होत आहे.

स्पर्धेत उत्कृष्ट खेळाचे प्रदर्शन करत त्याने कांस्यपदकावर आपले नाव कोरले आहे. रोहित थोरातने यावर्षी रशिया येथे झालेल्या आंतरराष्ट्रीय मॉस्को स्टार वूशू स्पर्धेमध्ये कांस्यपदक मिळवून देशाचे नाव उज्ज्वल केले आहे.

सध्या तो कॉलेज ऑफ फिजिकल एज्युकेशन,आष्टी येथे बी. पी. एड. शिक्षण घेत आहे.

आंतरराष्ट्रीय खेळाडू व राष्ट्रीय पंच लक्ष्मण उदमले तसेच उपाध्यक्ष श्याम पंडित यांचे मार्गदर्शन लाभले.

रोहित थोरात ने मिळवलेल्या यशाबद्दल विधानपरिषद सभापती प्रा. राम शिंदे, कर्जत-जामखेडचे आमदार रोहित पवार, जामखेड नगर परिषद च्या नगराध्यक्षा प्रांजल अमित चिंतामणी, विद्यापीठाचे क्रीडा संचालक डॉ. सचिन देशमुख सह मित्रमंडळी नातेवाईक यांनी अभिनंदन केले आहे.

NO COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

error: Content is protected !!