जामखेड तालुक्यातील एकाधिकार शाहीला चाप बसणार – सचिन घुमरे
अहमदनगर (अहिल्यानगर ) जिल्हा सहकारी बँकेवर अखेर प्रशासकाची नियुक्ती करण्यात आली. बँकेच्या संचालक मंडळाची मुदत संपल्याने आणि सरकारने निवडणूक लांबणीवर टाकल्याने हा निर्णय घेण्यात आला.
गौतम विठ्ठल निकाळजे (लेखा परीक्षक-वर्ग 1,सहकारी संस्था, अहिल्यानगर) यांची प्रशासक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. त्यांनी आज बँकेची सूत्रे घेतली. त्यानंतर विधान परिषदेचे सभापती प्रा. राम शिंदे यांची त्यांनी भेट घेतली. शिंदे यांनी त्यांचे स्वागत करून शुभेच्छा दिल्या.
सभापती प्रा.राम शिंदे यांनी प्रशासक गौतम निकाळजे यांना शुभेच्छा दिल्या यावेळी कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती शरद कार्ले, जामखेड नगर परिषदेचे उपसभापती पोपट राळेभात, गटनेते तात्याराम पोकळे,भाजपा जामखेड शहरमंडलाध्यक्ष संजय काशिद, कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक सचिन घुमरे, नगरसेवक पवन राळेभात, काँग्रेसचे राहुल उगले उपस्थित होते.
माजी आमदार चंद्रशेखर घुले यांच्या अध्यक्षतेखालील संचालक मंडळाची मुदत संपली आहे. दिवंगत आमदार शिवाजीराव कर्डीले यांच्या निधनानंतर अध्यक्षपदी घुले यांची निवड करण्यात आली होती. तर कर्डीले यांच्या जागी संचालक म्हणून आमदार अक्षय कर्डीले यांची निवड करण्यात आली होती. आता सगळ्यांची मुदत संपली आहे. निवडणूक होऊन नवीन संचालक मंडळ येऊ पर्यंत प्रशासक कामकाज पाहणार आहेत.
चौकट प्रशासकाच्या नियुक्तीमुळे जामखेड तालुक्यातील एकाधिकार शाहीला चाप बसणार – सचिन घुमरे
जामखेड तालुक्यातील सर्व सेवा सहकारी सोसायटीचे सचिव, सेवा सोसायटीचे संचालक मंडळ, बँकेचे सर्व कर्मचारी त्याचप्रमाणे जामखेड तालुक्यातील शेतकऱ्यांची मोठ्या प्रमाणात अडवणूक केली जात होती. राज्य शासनाच्या या निर्णयामुळे जामखेड तालुक्यातील सर्व शेतकऱ्यांमध्ये व सहकारांमध्ये काम करणाऱ्या सर्व कार्यकर्त्यांना मध्ये, आनंदाचे वातावरण आहे.