जामखेड न्युज—–
इम्रान कुरेशी मारहाण प्रकरणी अकरा जणांविरोधात जामखेड पोलीस स्टेशनला विविध कलमांर्तगत गुन्हे दाखल
पाच दिवसांपापुर्वी जामखेड शहराती जुन्या बस स्थानकासमोर इम्रान रफिक कुरेशी याची मोटारसायकल अडवून तू वसिम कुरेशी यांचे पैसे का देत नाहीत. त्याचे ऐकत का नाहीस म्हणत अकरा जणांच्या टोळक्याने लोखंडी गज, लाकडी काठी, हाँकी स्टीक, लोखंडी पाईपने जीवे मारण्याच्या उद्देशाने मारहाण केली. यात इम्रान कुरेशी हे गंभीर जखमी झाले आहेत.

पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की, फिर्यादी इम्रान रफिक कुरेशी हे दिनाक 28/04/2026 रोत्री 09/30 वा सुमारास गॅलक्सी कटींगचे दुकानाचे उद्घाटनाचे कार्यक्रम संपवुन सुझुकी कंपनीच्या बर्गमँन मोटरसायकल वरुन घरी जात असताना खर्डा चौकाच्या जवळ रोडवर अचानक सदर ठिकाणी थांबवुन असलेले 1) गुलजार शेख हातात लोखंडी गज 2 ) राहिल अस्लम तांबोळी हातात लोखंडी पाईप3) मजहर अलील शेख हाँकी स्टीक 4) सलमान तय्या सय्यद हातात लोखंडी गज 5 ) शाहीर कुरेशी हातात लाकडी काठी 6) हिदायत बब्बु 7) मज्जु खानसाहब पठाण हातात लाकडी काठी 8) शाहीर बागवान हातात लाकडी काठी 9) समीर फारुक कुरेशी हातात लाकडी काठी 10) वसीम वाहीद कुरेशी, 11) साजीद वाहीद कुरेशी असे धावत माझ्या मोटारसायकलला आडवे आले मला जीवे मारण्याच्या उद्देशाने मारहाण केली. यात फिर्यादी गंभीर जखमी झाले.

त्यावेळी गुलजार शेख मला म्हणाला की आम्हाला वसीम भाई बिल्डर व साजीद भाई यांनी पाठविले आहे . तुम्ही त्यांना पाच लाख रुपये का दिले नाहीत तुम्ही भाईचे का ऐकले नाही आज तुमचा गेम वाजवुन टाकतो असे म्हणुन गुलजार याने त्याचे हातातील लोखंडी गज माझे डोक्यात जिवे ठार मारण्याचे उद्देशाने मारत असताना मी माझा डावा हात डोक्यावर आडवा घेतला तसेच त्याचे सोबतचे इतर जणांनी त्यांचे जवळील हत्याराने माझे पायावर, हातावर, पाठीवर जिवे ठार मारण्याचे उद्देशाने मारहाण करुन गंभीर जखमी केले.

तसेच माझे मोटारसायकल वर काठीने लोखंडी गजाने मारुन गाडीने नुकसान केले तसेच सदर ठिकाणी लोक जमा होत असल्याचे पाहुन सर्वजण शिवीगाळ करत मोटारसायकल वर निघुन गेले मी जखमी अवस्थेत पडलेलो असताना तेथे माझे भाऊ इरफान रफीक कुरेशी व इफ्तेकर रफीक कुरेशी असे खर्डा चौकातुन माझे जवळ आले व त्यांनी मला अँम्बुलन्समधुन समर्थ हॉस्पीटल जामखेड येथे प्राथमिक उपचार करुन श्रीदिप हाँस्पीटल अहिल्यानगर येथे औषध उपचारकमी दाखल केले. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

वरील घटनेचा तपास पोलीस निरीक्षक दशरथ चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली सपोई किशोर गावडे करत आहेत.





